सुधारणा करून प्रवाशांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील : निलेश राणे

कुडाळ आगारात पाच एसटी बसचे झाले लोकार्पण


कुडाळ : कुडाळच्या एसटी बस स्थानकामध्ये काय चुका झाल्या त्याच्यावर टीका करण्यापेक्षा आता सत्ता आपली आहे. त्यामुळे प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा देण्याची जबाबदारी आपली आहे; त्या सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्या सुधारणा करण्यासाठी मी प्रयत्न करेन असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील 'लालपरी' लोकार्पण सोहळ्यावेळी दिले.



कुडाळ एसटी बस आगाराला प्राप्त झालेल्या ५ लाल परी बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ एस. टी. बस स्थानक येथे संपन्न झाला. यावेळी यंत्र अभियंता सुजित डोंगरे, विभागीय स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे, कुडाळ एसटी बस आगार प्रमुख रोहित नाईक, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस तालुकाप्रमुख दीपक नारकर, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, शहर प्रमुख ओंकार तेली, संघर्ष समितीचे निलेश तेंडुलकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, आदी उपस्थित होते.


या लोकार्पण सोहळ्यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, कुडाळ एसटी बस आगाराच्या अनेक समस्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ही सेवा प्रवाशांसाठी मिळते. त्यामुळे ती सेवा चांगल्या प्रकारे मिळावी ही आमची धारणा आहे. त्यामुळेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आमच्या मागण्या दिल्या आहेत. अजून ज्या काही मागणी आहे त्या पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करत राहीन. ज्यांनी चुका केल्या आहेत त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्या सुधारणा करण्यावर मी भर देणार आहे.


कुडाळ शहरांमध्ये अनेक समस्या आहे सर्वात मोठी समस्या ही वाहतूक कोंडीची आहे ही समस्या सोडवण्यासाठी पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नगरपंचायत यांच्या बैठक घेऊन वाहतूक कोंडीचे नियोजन केले जाणार आहे. हे शहर एकविसाव्या शतकातील दिसलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, असे निलेश राणे यांनी सांगितले. कुडाळ एसटी बस आगाराला मिळालेल्या ५ लालपरी बसा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी या लाल परी बस मधून एसटी बस स्थानक ते कुडाळ पोलीस ठाण्यापर्यंत प्रवास केला यामध्ये कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

कणकवलीत उद्या नगरपंचायतीसाठी मतदान

ईव्हीएमसह अधिकारी - कर्मचारी केंद्रांकडे रवाना कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या (२ डिसेंबर) मतदान

कणकवली बाजारपेठेत भाजपची प्रचार रॅली

कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि १७ नगरसेवक

माझा पाठिंबा भाजपच्या उमेदवारांनाच खासदार नारायण राणे यांची स्पष्टोक्ती

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ उमेदवारांनी घेतले खासदार राणे यांचे

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारात पालकमंत्री नितेश राणेंची एन्ट्री

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुध्द शहर विकास आघाडी अशी लढत आहे. निवडणुकीचे वातावरण

अखेरच्या दिवशी सिंधुदुर्गात इच्छुकांची धावपळ

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले नगर परिषद तर कणकवली नगरपंचायतीची निवडणूक

वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मजबूत धक्का

आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल वैभववाडी : वैभववाडी परिसरात राजकीय