Thursday, October 30, 2025
Happy Diwali

शनिशिंगणापूर देवस्थानने १६७ कर्मचाऱ्यांना काढले कामावरून

शनिशिंगणापूर देवस्थानने  १६७ कर्मचाऱ्यांना काढले कामावरून

११४ मुस्लीम कर्मचाऱ्यांचा समावेश

मुंबई : शनिशिंगणापूर देवस्थानने १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हे सर्व कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये ११४ मुस्लीम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनियमितता आणि शिस्तीचे पालन न केल्याच्या कारणावरून काढण्यात आल्याचे स्पष्टीकरण देवस्थानने दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुस्लीम कर्मचाऱ्यांना काढण्याबाबत हिंदू संघटनांचा दबाव होता. शनी देवाच्या चौथऱ्यावर मुस्लीम लोकांच्या हाताने काम करून घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

शनिशिंगणापूर मंदिरात मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू झाला होता. ११४ मुस्लीम कर्मचाऱ्यांविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. ट्रस्टने मुस्लीम कर्मचाऱ्यांना न काढल्यास १४ जून रोजी हिंदू समाजाकडून मंदिराबाहेर रॅली काढली जाईल, असा इशारा देण्यात आला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >