भयानक अपघातातही प्रवाशाला वाचवणारी सीट क्रमांक 11A, २७ वर्षांपूर्वीही एक जण वाचला होता

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या AI 171 विमानाचा अपघात झाला. या अपघातात विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विमान जिथे कोसळले त्या भागातील काही नागरिकांचाही मृत्यू झाला. अपघातामुळे एकूण २७४ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात विमानात 11A या सीटवर बसलेल्या रमेश विश्वासकुमार यांचा जीव वाचला. ते अपघात झाला त्यावेळी आश्चर्यकारकरित्या विमानातून बाहेर फेकले गेले आणि वाचले.

याआधी २७ वर्षांपूर्वी १९९८ मध्ये थायलंडमध्ये विमान थाई एअरवेजच्या TG 261 विमानाला अपघात झाला होता. या अपघातात विमानातील १०१ जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे त्या विमानातील 11A या सीटवर बसलेल्या रुआंगसाक यांचा जीव वाचला होता. आता अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी समजली आणि फक्त 11A या सीटवर बसलेला प्रवासी वाचल्याचे कळले त्यावेळी रुआंगसाक यांच्या १९९८ च्या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.

एखाद्या विमानात आपल्यासोबत असलेल्या सर्वांचा मृत्यू होतो आणि फक्त आपण वाचतो तेव्हा वाचल्याचा आनंद साजरा करावा आणि आपल्यासोबतचे सर्व कधीच दिसणार नाहीत याचे दुःख करत बसावे हेच समजत नाही. मन संभ्रमावस्थेत सापडते. असेच आधी रुआंगसाकचे आणि आता रमेशचे झाले आहे. याआधी १९८५ मध्ये नेवाडात एका विमान अपघातात एकटा जॉर्ज लॅमसन वाचला होता. त्याची पण वाचल्यानंतर काही दिवस गोंधळल्यासारखी स्थिती होतो.

 

 
Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,