सांगलीत ड्रगचा कारखाना चालवणाऱ्याला UAE मध्ये पकडले, भारतात आणले

नवी दिल्ली : भारतामध्ये महाराष्ट्रात सांगली येथे सिंथेटिक ड्रग तयार करण्याचा कारखाना चालवणारा ताहेर सलीम डोला हा वाँटेड आरोपी पोलीस शोधत असल्याचे लक्षात येताच यूएईला पळून गेला होता. त्याला यूएई येथे पकडण्यात आले. त्याचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य युनिट, केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था अर्थात सीबीआय (Central Bureau of Investigation) आणि अबुधाबी येथील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी यांनी संयुक्त कारवाई करुन ताहेर सलीम डोला याला पकडले आहे.

भारताच्या रेड कॉर्नर नोटीसला प्रतिसाद देत यूएईमधून ताहेर सलीम डोलाला पकडण्यात आले आहे. पकडल्यानंतर अवघ्या काही तासांत त्याचा ताबा भारताला मिळाला आहे. मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात ताहेर सलीम डोला विरोधात ड्रगचा कारखाना चालवल्याप्रकरणी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ताहेर सलीम डोला आणि इतरांशी संबंधित असलेल्या सांगलीच्या कारखान्यातून एकूण १२६.१४१ किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग (अमली पदार्थ) जप्त करण्यात आला आणि दोन हजार ५२२ लाख रुपये किमतीचे औषध जप्त करण्यात आले . ही कारवाई मुंबई पोलिसांनी सांगलीत जाऊन केली होती. कारवाई केल्यानंतर पोलिसांनी सीबीआयच्या मदतीने ताहेर सलीम डोला विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षांत इंटरपोलच्या सहकार्याने भारताने १०० पेक्षा जास्त आरोपींना परदेशातून पकडून भारतात आणले आहे.
Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे