Pune News : सावधान! पुण्यात जलजन्य आजारांचा धोका

कडक उन्हापासून दिलासा देणारा पावसाळा ऋतू. मात्र यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस धुमाकूळ घालतोय. पुण्यात या जोरदार पावसाने सोबत अनेक जलजन्य आजार आणलेत. या काळात सतत आर्द्रता आणि पाणी साचल्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यामुळं संसर्ग पसरण्याचा धोका वाढलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टॉयफॉइड, कावीळ, तीव्र अतिसाराचे रुग्ण वाढत असल्याचं पुणे महानगरपालिकेच्या आकडेवारीवरून समोर आलयं.


?si=z7MmqcdZ4LuJCPoq

पुण्यात यंदा जानेवारी महिन्यात दुषित अन्न व पाण्यातून गुलेन बॅरी सिड्रोम म्हणजे जीबीएस हा आजार पसरला होता. याची लागण झाल्यावर मेंदूविषयक गुंतागुंत होते. अतिसार व ओटीपोटात वेदना होतात. यामुळं महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाला. अनेक उपाययोजना होती घेतल्या. शहरात पावसामुळं जागोजागी पाण्याची डबकी साचल्यानं दुषित व घाण पाणी साचून राहते. यामुळं आजारांना निमंत्रण मिळत आहे. पावसाळ्यात वाढलेल्या जलजन्य आजार वाढल्यानं सरकारी व खासगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा जानेवारी ते मे या महिन्यांत जलजन्य आजाराचे पाच हजार ६१७ रुग्र आढळले आहेत.



कोणत्या आजाराचे किती रुग्ण आढळले ते पाहूया.



१. तीव्र अतिसार : ४ हजार २९२ रुग्ण
२. कावीळ : ६६
३. आमांश : १०६
४. विषमज्वर : ८६
५. लेप्टोस्पारेसिस : २
६. जुलाब : ९७६
७. गॅस्टो : ९५



काय आहेत जलजन्य आजाराची लक्षणे ते पाहूया...



ताप येणे, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, ओटीपोटात दुखणे, सांधे दुखणे


नागरिकांनी उलट्या,जुलाब विषमज्वर हे आजार झाल्यास तातडीने उपचार करून घ्यावेत. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांत हे उपचार उपलब्ध आहेत, असं आरोग्य विभागानं म्हटलयं.



 नागरिकांनी काय काळजी घ्यावी?



  • शुद्ध पाणी प्यावे. कूपनलिका, विहिर व कालव्याचे अशुद‌्ध पाणी पिऊ नये.

  • शिळे व माशा बसलेले अन्न खाऊ नये.

  • पाणी गाळून व २० मिनिटे उकळून व नंतर थंड करून प्यावे.

  • पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत. स्वच्छ करावेत.

Comments
Add Comment

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या