विक्रांत मेस्सीला अहमदाबाद विमान अपघाताचा धक्का; म्हणाला, 'काकांचा मुलगा गमावल्याचं दुःख अधिक वेदनादायी'

मुंबई : अहमदाबादमधून लंडनला निघालेल्या एका विमानाला टेकऑफनंतर अवघ्या काही वेळातच भीषण अपघात झाल्याने देशभरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेत २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, ज्यात बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. विमान थेट त्यांच्या वसतिगृहाच्या मेसवर कोसळले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. विमानात प्रवासी आणि क्रू मेंबरसह २४२ लोक होते. विशेष म्हणजे, या विमानाचे पहिले अधिकारी (फर्स्ट ऑफिसर) क्लाईव्ह कुंदर हे अभिनेता विक्रांत मेस्सी यांच्या कुटुंबाचे मित्र होते.


विक्रांत मेस्सी या दुर्दैवी अपघातात आपल्या कुटुंबातील मित्राला गमावल्याने दुःखी आहे. 'माझ्या काकांनी त्यांचा मुलगा गमावला हे ऐकून मला आणखी वेदना होत आहेत,' असे त्याने म्हटले आहे.



अहमदाबादमधील या भीषण अपघातानंतर अभिनेता विक्रांत मेस्सीने सोशल मीडियावर आपलं दुःख व्यक्त केलं. त्याने सांगितलं की, विमानात पहिले अधिकारी म्हणून काम करणारे त्याचे कौटुंबिक मित्र या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत.


विक्रांत मेस्सीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे, 'आज अहमदाबादमध्ये झालेल्या या अकल्पनीय आणि दुःखद अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि प्रियजनांसाठी माझं हृदय तुटतंय. मला हे जाणून आणखी वेदना होत आहेत की, माझे काका, क्लिफर्ड कुंदर, यांनी त्यांचा मुलगा क्लाईव्ह कुंदरला गमावले आहे. क्लाईव्ह कुंदर हे त्या दुर्दैवी विमानाचे पहिले अधिकारी होते. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला, काका, तसेच या घटनेने ज्यांना खोलवर धक्का बसला आहे, त्या सर्वांना शक्ती देवो.'

Comments
Add Comment

बदरी-केदारसह चारधाममध्ये मोबाईल बंदी ,प्रशासनाची रील आणि फोटोवर कडक नजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेची मर्यादा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी यावर्षी

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष

प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर 'गणेशोत्सवा'चा भव्य चित्ररथ नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : राजधानी नवी दिल्ली

भाजप हीच देशाची पहिली पसंती: पंतप्रधान मोदी

सुशासनासाठी जनतेचा विक्रमी जनादेश! देशाला आता केवळ विकास आणि 'गुड गव्हर्नन्स' हवा दिसपुर (वृत्तसंस्था): आज भाजप

Papa Rao Killed in Encounter : नक्षलवाद्यांचा अजून ईक्का ठार..पोलीसांची मोठी कारवाई.

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे व तेथील नागरिकांना ही दिलासा

भारतीय सेनेच्या ताफ्यात कामिकाझे ड्रोन

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सेना आपल्या लढाऊ क्षमतेत सातत्याने वाढ करत असून, त्याचाच भाग म्हणून सेनेने

प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

दहशतवादी हल्ल्याचे सावट नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा