जिल्ह्यातील ६५४ गावांत राबविणार जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान

१५ जूनपासून जनजागृती मोहिमेला प्रारंभ


पालघर:आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तिकरणासाठी केंद्र शासनाच्या वतीने 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यातील ६५४ गावांमध्ये १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत विशेष जनजागृती मोहिम राबविण्यातयेणार आहे.


या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी बांधवांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ गावपातळीवर उपलब्ध करून देणे होय. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत विविध तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आला आहे.


जव्हार १०७, मोखाडा ५३, विक्रमगड ९३, वाडा ८७, पालघर ९२, तलासरी ३७, डहाणू १६३ आणि वसई तालुक्यातील २२ गावांमध्ये ही जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान गावांमध्ये शिबीरे आयोजित करून नागरिकांना आधार कार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र, पीएम किसान योजना व जनधन खाते उघडने, तसेच सिकलसेल आजारासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.


याशिवाय आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, महसूल आदी विभागांमार्फत विविध लाभ योजना प्रत्यक्ष दिल्या जाणार आहेत.या अभियानामुळे आदिवासी समुदायाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी व्यक्त केला असून, सर्व संबंधित विभागांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

नगराध्यक्ष हरले, मात्र जिल्हाध्यक्ष जिंकले

जिल्ह्यात भाजपचे ९४ पैकी ५० नगरसेवक गणेश पाटील पालघर: पालघर जिल्ह्यात तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या

भाजप नेत्यांचे ‘रायगड’वर विचारमंथन

टिळक भवनात आज काँग्रेसची खलबते वसई : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

मच्छीमारांच्या सर्वांगीण सर्वेक्षणाला गती

वाढवण बंदर प्रकल्प: जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या

कुडूसला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा

५२ गावांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाची मंजुरी वाडा : वाडा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ५२

पालघरच्या मजुरांचा ‘मस्टर रोल’ राज्यभर पोहोचणार

ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून उपक्रमाचे कौतुक पालघर : पालघर जिल्ह्यातील मनरेगा योजनेअंतर्गत

एकाच महिला नेत्याला मिळाला प्रथम नागरिकाचा मान!

वसई-विरारमध्ये पाच पुरुष महापौर गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी