Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा 'ॲक्टीव्ह मोडवर'

मुंबईत 'या' तारखेपासून करणार उपोषणाला सुरुवात


मागील दोन वर्षांपासून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षण (Maratha Reservation) च्या  मुद्द्यावरुन सातत्याने आंदोलन उपोषण करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्थगित केलेलं उपोषण आता पुन्हा एकदा जरांगेंनी मनावर घेत सरकारविरोधात आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आता थेट मुंबई गाठून मुंबईत उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द जरांगे यांनी केली आहे.  येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत. ते अंतरवली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलत होते.


मनोज जरांगे यांचं ठरलं


पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आमच्या लेकराबाळांचं जर वाटोळ होत असेल आता आम्ही शांत बसणार नाहीत. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. त्यांचे पुरावे पोलिस पाटील, ग्रामपंचायत देवस्थानाकडे यासंदर्भातील पुरावे आढळून आलेले आहेत. त्यामुळे आता मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा कायदा सरकारने पारित करावा, आणि गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ ऑगस्टला मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलीयं. दरम्यान, आता कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही. सरकारकडे आता कारणच नाही मराठा समाजाने काय करायचं आता हे एक ऑगस्टला आपण सांगणार आहे.


29  ऑगस्टला मुंबईमध्ये उपोषण करणार असून मराठा कुणबी एकच हा अध्यादेश अद्याप काढलेला नाही मागणीवर आम्ही ठाम आहोत. कायदा पारित करायचा असेल तर आम्हाला वेळ देण्याची मागणी गिरीश महाजनांनी केली होती, त्यानंतर आम्ही वेळ दिला. कायद्याला आधार लागतो असं महाजन म्हणत होते, ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत हे पुरावे खूप झाले आहेत आधारासाठी, असं मनोज जरांगे यांनी पुढे म्हंटले आहे.
Comments
Add Comment

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत

तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद, भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर समितीने घेतला निर्णय

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची आई तुळजाभवानी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. याच कारणामुळे या

पाच महिन्यांचा छळ आणि अखेर दुर्दैवी शेवट; डॉक्टर तरुणी प्रकरणाची A टू Z कहाणी उघड

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिस आणि राजकीय दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याने

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद