Gold Rate Today: सोन्याचा नवा उच्चांक ' इतक्या ' रूपयांवर पोहोचले चांदीत मात्र घट

  150

मुंबई : सोन्याच्या दरात जागतिक संकटामुळे भरमसाठ वाढ होत आहे. काल सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ' गुड रिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार,काल २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ८१ रुपयांनी वाढ झाली होती. आज त्याचीच पुनरावृत्ती होत आणखी प्रति ग्रॅम २४ कॅरेट दरात ८८ रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता सोन्याचे दर नव्या उच्चांकावर पोहोचल्याने सोन्याच्या २४ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९९२८ रूपये आहे तर त्याची प्रति तोळा किंमत ८८० रूपयांनी वाढत ९९२८० रूपयांवर पोहोचले आहे.

२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोनेदेखील ८० रूपयांनी वाढत ९१०० रूपयांवर पोहोचले आहे तर त्याचे प्रति तोळा दर ८०० रूपयांनी वाढत ९१००० रूपयांवर पोहोचले आहेत. १८ कॅरेट सोने प्रति ग्रॅम किंमत ६६ रूपयांनी वाढत ७४४६ रूपयांवर तर प्रति तोळा किंमत ६६० रूपयांनी वाढत ७४४६० रूपयांवर पोहोचले आहे.

एमसीएक्स (Multi Commodity Exchange) निर्देशांकातदेखील प्रचंड वाढ झालेली आहे. निर्देशांकात १.४१% वाढ होत दर पातळी ९८०६६.०० रूपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) हा १.५०% ने वाढला आहे.

चांदीच्या दरात किरकोळ घसरण कायम !

चांदीच्या दरात मात्र किरकोळ घसरण कायम राहिल्याने चांदीच्या प्रति ग्रॅम किंमत ०.१० रूपयांनी घट १०८.९० रूपयांवर पोहोचली आहे तर किलोमागे १०० रूपये घटल्याने किलोची किंमत १०८९०० रूपयांवर पोहोचली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.८२% वाढ झाली असून पातळी १०६२५६.०० रूपयांवर पोहोचली आहे.

मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावादरम्यान सोन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.सोन्याचे खरेदीदार मध्य पूर्व भू-राजकीय तणाव आणि यूएस उत्पादक किंमत निर्देशांक (पीपीआय) डेटावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. चांदीच्या मागणीत व पुरवठ्यात फारसा बदल न झाल्याने चांदीने आपली पातळी कायम राखली आहे.
Comments
Add Comment

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम