बनावट खतांचा साडेसात लाखाचा साठा जप्त ; कृषी विभागाची राहुरीत मोठी कारवाई

राहुरी - बनावट खत विक्री करत असलेल्या दुकानावर छापा मारत तब्बल साडेसात लाखाचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे. यासंदर्भात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभाग पथकाने राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे दि. ११ जून रोजी कारवाई करुन बनावट खतांचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी संदीप यमाजी जाधव रा. पाथरे खुर्द याच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ आणि रासायनिक खते (नियंत्रण) आदेश, १९८५ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.


अहिल्यानगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना १० जून, २०२५ रोजी गुप्त माहिती मिळाली की,पाथरे खुर्द येथील चैतन्य हार्डवेअर (वळण रोड, पाथरे खुर्द) मध्ये विनापरवाना खतांचा साठा असून त्यांची विक्री केली जात आहे. या गुप्त माहितीच्या आधारे, राहुल ढगे यांनी राहुरी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब अण्णासाहेब शिंदे आणि कृषी अधिकारी गणेश नारायण अनारसे यांच्या पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथील गोदामात विक्रीसाठी ठेवलेल्या ५० किलोच्या गोण्या, १० किलोच्या बादलीतील खते आणि १ लिटर मधील द्रव खते मोठ्या प्रमाणात आढळून आली.


संदीप यमाजी जाधव, वय ४२ वर्षे, रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी, याची चौकशी केली असता, त्याच्याकडे खते विक्री आणि साठवणुकीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. तसेच त्याने खत खरेदीची बिले किंवा साठा नोंद वही (पुस्तक) यासारखी कोणतीही आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. या कारवाईत एकूण रु. ७ लाख ४९ हजार ७३० रुपए किमतीचा खतांचा साठा जप्त करण्यात आला. ज्यात विविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचा समावेश आहे.संदीप यमाजी जाधव याने विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने खतांचा साठा करून त्यांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना विक्री बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले असून हा साठा इतरत्र हलवू नये, अशा सूचना देण्यात आल्या. पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास