मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतरही प्रवाशांची प्रतीक्षाच

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मेट्रो-३ मार्गिकवरील प्रवासी संख्या बऱ्यापैकी वाढेल, असा विश्वास मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनला (एमएमआरसी) होता; परंतु दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन एक महिना पूर्ण झाला तरी दैनंदिन प्रवासी संख्येत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. या मार्गिकेवर दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या आसपास आहे.


प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक नसून प्रवासी संख्या वाढविण्यासाठी आता एमएमआरसीने थेट खासगी संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, कोणते पर्याय स्वीकारता येतील याचा अभ्यास करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरसीने निविदा मागविल्या आहेत.



एमएमआरसी ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो-३ मार्गिकेचे काम करीत आहे. यातील आरे ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे, तर महिन्याभरापूर्वी १० मे रोजी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आरे-बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करताना या मार्गिकेवरून अंदाजे चार लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र या टप्प्याला प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.


त्यामुळेच या मार्गिकेवरून दिवसाला अवघे २० हजार प्रवासी प्रवास करीत होते. या मार्गिकेतील बीकेसी–आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा एमएमआरसीला होती. त्यानुसार प्रवासी संख्येत काहीशी वाढ झाली आहे. मात्र ही वाढ मोठी, समाधानकारक नाही. यासाठी एमएमआरसीने नुकत्याच इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व