शहापुरातील शेतकऱ्यांना तीन महिने पैसे नाहीत

शेतकरी आर्थिक संकटात


शहापूर : तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कारण, त्यांनी शासनाच्या अधिकृत खरेदी केंद्रावर धान्यविक्री करून दोन ते तीन महिने उलटले असतानाही त्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.


यावर्षी शासनाने धान्याला हमीभाव देत बोनसचीही घोषणा केली होती, त्यामुळे बाजारपेठेच्या तुलनेत अधिक दर मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर आपले भात पोहोचवले. परंतु या खरेदी प्रक्रियेनंतरही तब्बल १ हजार ५०० शेतकऱ्यांना ना मूळ विक्री रक्कम मिळाली आहे, ना बोनस.


परिणामी बियाणे, खते, मशागत यांसाठी लागणारा खर्च करणे शेतकऱ्यांना अशक्य होत चालले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि मान्सूनचे आगमन झाल्यामुळे खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, खात्रीशीर उत्पन्नाच्या अभावी आणि थकीत रक्कम न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अडचणीत आणणारी झाली आहे. ट्रॅक्टर भाड्याने घेणे, बियाणे खरेदी करणे, खते मिळवणे यासाठी पैशांची नितांत गरज आहे. पण बँकांच्या दारात फेऱ्या मारूनही पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी शासनाने दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.


हमीभाव २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला असून बाजार भावाच्या तुलनेत हा पर्याय नक्कीच चांगला वाटतो. पण जेव्हा मूळ विक्री रक्कमच शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाही, तेव्हा बोनस फक्त कागदावरच उरतो, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाकडून बोनस जाहीर करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या हाती केव्हा पडणार, याचा काही अंदाज नसल्याचे ॲड. प्रशांत घोडविंदे यांनी सांगितले.


लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा करावी आणि बोनसही वितरित करावा. अन्यथा खरिपाची तयारी करणे कठीण होईल आणि शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर जाईल. यावर्षी हवामान बदलामुळे आधीच पीक नुकसान झाले आहे, त्यात शासन वेळेवर पैसे देत नसेल, तर शेतकऱ्यांचा शासनावरचा विश्वास पूर्णपणे ढासळेल. त्यामुळे शासनाने आणि संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे, असे भात उत्पादक शेतकरी भगवान सांबरे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे

अरे बापरे! तब्बल १२ हजार कोटींची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त! मीरा-भाईंदर पोलिसांची कमाल!

मीरा-भाईंदर: मीरा रोडमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना