शाळांच्या वेळापत्रकात बदल; आता शाळा सकाळी ७ ऐवजी ९ वाजता

  157

पुणे : पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळा येत्या १६ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळा सुरू होण्यापूर्वी तयारी सुरू केली आहे. शाळेसाठी नवीन दप्तर, वॉटर बॉटल, वह्या, पुस्तक खरेदी करणं सध्या सुरू आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांचे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता शाळा सकाळी सात ऐवजी ९ वाजता सुरू होणार आहे.



महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची सुरूवात येत्या १६ जूनपासून होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शाळा सकाळी ७ ऐवजी ९ वाजता भरतील आणि सायंकाळी ४ वाजता सुटतील. म्हणजेच सकाळी ९ ते सायंकाळी ४ ही शाळेची वेळ असणार आहे.


शाळांच्या नव्या वेळापत्रकानुसार, सकाळी ९ वाजल्यापासून ते ९.२५ पर्यंत परिपाठ राहिल. ९.२५ ते ११.२४ पर्यंत सुरूवातीचे ३ लेक्चर होतील. ११.२५ पासून ते ११.३५ पर्यंत १० मिनिटांची छोटी सुट्टी असेल. ११.३५ ते १२.५० पर्यंत दोन लेक्चर होतील. १२.५० ते १.३० वाजेपर्यंत मधली सुट्टी होईल. त्यानंतर १.३० ते ३.५५ वाजेपर्यंत उर्वरित लेक्चर होतील. त्यानंतर शेवटच्या ५ मिनिटांमध्ये वंदे मारतम होईल आणि शाळा सुटतील.


दरम्यान, राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहे. उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या असून आता लवकरच शाळा सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे. तर सीबीएसई बोर्डाची शाळा  ९ जूनपासून  सुरू झाल्या आहेत . राज्यातील ११ जिल्हे वगळता सगळीकडे शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भामध्ये इतर विभागांच्या तुलनेत थोड्या उशिराने शाळा सुरू केल्या जातात.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल