चार्जिंग स्टेशनअभावी एनएमएमटीचा बोजवारा

  36

केवळ चारच ठिकाणी चार्जिंग स्टेशन


तुर्भे : पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी एनएमएमटीच्या वतीने इलेक्ट्रिक गाड्यांना प्राध्यान्य दिले जात आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा कल आहे. या बससाठी शहरात २१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, मात्र तो धूळखात पडून आहे. त्यामुळे अपुऱ्या चार्जिंग स्टेशनअभावी चार्जिंगची गैरसोय होत आहे. त्यातच चार्जिंगसाठी बराच वेळ लागत असल्याने अन्य गाड्यांतून प्रवाशांना पुढील प्रवास पूर्ण करावा लागत आहे.



सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात ५० टक्के इलेक्ट्रिक बसेस आहेत, मात्र चार्जिंग स्टेशन फक्त चारच ठिकाणी आहेत. घणसोली, तुर्भे आगाराबरोबर वाशी रेल्वे आणि नेरूळ येथील बसस्थानकात चार्जिंगसाठी स्टेशन उभारण्यात आलेली आहेत. जवळच्या मार्गावर या बसेस चालवताना चार्जिंग संपण्याअगोदर त्या आगारात पाठविल्या जातात.

२१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव


बस चार्जिंगसाठी शहरात २१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार होती, मात्र हे चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तीन वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशनची उभारणी होऊ शकलेली नाही. आतापर्यंत शहरात केवळ चार चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत. अपुऱ्या चार्जिंग स्टेशन अभावी गाड्यांना चार्जिंग करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या चार्जिंगअभावी अर्ध्या प्रवासात बंद पडत आहेत.
Comments
Add Comment

कल्याणमध्ये आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवरुन वातावरण तापलं, शिवसेना - मनसे आमनेसाने

कल्याण : कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली.

पनवेल-कल्याण रेल्वे दिवामार्गे करण्याची गरज

डोंबिवली : पेण-पनवेल-कल्याण रेल्वे दिवा मार्गे सुरू करण्याची नितांत गरज आहे. ही सेवा सुरू केल्यानंतर लाखो

केडीएमसी संत ज्ञानेश्वर विद्यालयात सुविधांची दुर्दशा

कल्याण : टिटवाळा मांडा पश्चिमेतील मनपाच्या संत ज्ञानेश्वर शाळेचे गळके छप्पर पाहता, सोयी सुविधा अभावी शाळेची

दोन कोटींच्या अमली पदार्थांच्या म्होरक्याला हैदराबाद विमानतळावर अटक

कल्याण : मानपाडा पोलीसांनी डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात सुमारे दोन कोटी करोड रूपयांचे १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी)

डोळ्यांसमोर पाणी असूनही घागर रिकामीच

विजेच्या अघोषित भारनियमनाने बदलापूरकर हैराण बदलापूर : बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. चौथी मुंबई

भाजपा आमदार किसन कथोरेंच्या बंगल्याबाहेर गोळीबार

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर गोळीबार झाला. या गोळीबारात