कायमस्वरूपी गैरहजर राहणाऱ्या सफाई कामगारांवर होणार कारवाई

  77

‘सचेत’ अ‍ॅपचा वापर करण्याचे निर्देश  


मुंबई : स्वच्छता ही केवळ एखाद्या विशिष्ट अभियानापुरती मर्यादित न ठेवता नियमित आणि जबाबदारीने स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सक्रियपणे कार्य करावे. तरीही, घनकचरा व्यवस्थापन विभागातील प्रत्यक्ष दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी नेमलेले, मात्र कायमस्वरूपी गैरहजर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. दरम्यान कनिष्ठ अभियंत्यांना सचेत अॅपचा वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात शहर विभागातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामगिरीचा डॉ. जोशी यांनी परळ येथील महापालिकेच्या एफ विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला.


त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे, उपायुक्त प्रशांत सपकाळे, उपायुक्त किरण दिघावकर, शहर विभागातील सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.



आढावा घेतल्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या, स्वच्छतेसंदर्भात आयोजित एखाद्या अभियानात मोठ्या प्रमाणात कचरा संकलित होत असेल, तर नियमितपणे देखील तितक्याच कचऱ्याचे संकलन व्हायला हवे. स्वच्छतेसंदर्भातील अभियानाने प्रोत्साहन मिळत असले तरी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण होणेही तितकेच महत्वाचे आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले स्वच्छता कर्मचारी नियमितपणे त्यांची जबाबदारी पार पाडत असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. तरीही, ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून एखादा कर्मचारी कायमस्वरुपी गैरहजर असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी.


सहायक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता आदींनी ‘सचेत’ अ‍ॅपचा नियमितपणे वापर करावा. तसेच, संबंधित प्रशासकीय विभागाच्या सहायक आयुक्त यांनी आपापल्या भागातील घनकचराविषयक गरजा, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणारी ठिकाणे आणि नागरिकांच्या वर्दळीच्या वेळा लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार नियोजनासाठी सूक्ष्म आराखडा सादर करावा, असे निर्देशही डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी दिले. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कार्यरत असलेले सहायक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील परिसरात नियमितपणे परिक्षण करावे. तसेच, कुठेही कचरा आढळणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी केली.


Comments
Add Comment

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक