पंतप्रधान मोदींचा सायप्रस दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ शिखर परिषदेसाठी कॅनडाला जाण्याआधी सायप्रस या देशाचा दौरा करणार आहेत. ते कॅनडाती शिखर परिषदेनंतर मायदेशी परतण्याआधी क्रोएशियाचा दौरा करणार आहेत. सायप्रस आणि क्रोएशिया हे दोन्ही देश युरोपियन युनियनचे सदस्य आहेत. पंतप्रधान मोदी या दोन्ही देशांच्या माध्यमातून युरोपियन युनियनमधील भारताची गुंतवणूक वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. सायप्रस २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांसाठी युरोपियन युनियनचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. यामुळे पंतप्रधान मोदींच्या सायप्रस दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. याआधी पंतप्रधान मोदी मे महिन्यात क्रोएशिया, नेदरलँड आणि नॉर्वे या तीन देशांचा दौरा करणार होते. पण पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी नागरिकांची हत्या केली. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आणि पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा रद्द झाला होता.

जी ७ शिखर परिषद कॅनडातील अल्बर्टा येथे १५ ते १७ जून दरम्यान होणार आहे. या परिषदेचे आमंत्रण पंतप्रधान मोदींना आयत्यावेळी मिळाले आहे. पंतप्रधान मोदींचा जी ७ शिखर परिषदेचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण सायप्रस दौरा निश्चित झाला आहे. याआधी २००२ मध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि १९८३ मध्ये इंदिरा गांधी यांनी सायप्रसचा दौरा केला होता.

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर तुर्कस्तानने पाकिस्तानची बाजू घेतल. भारताने ऑपरेशन सिंदूर केले त्यावेळी तुर्कीने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत केली. या पार्श्वभमीवर पंतप्रधान मोदींच्या सायप्रस दौऱ्याला विशेष महत्त्त्व आहे. तुर्कीने सायप्रसच्या काही भागांना जबरदस्तीने ताब्यात घेतले आहे. या भागात १९७४ पासून तुर्कीच्या सैन्याने घुसखोरी केली आहे. यामुळे सायप्रस आणि तुर्की यांच्यात अनेक वर्षांपासून भूखंडाचा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सायप्रसचा दौरा करत आहेत. याआधी २०२३ मध्ये पंतप्रधान मोदींनी ग्रीसचा दौरा केला होता. ग्रीस या देशाचा दौरा करणारे ४० वर्षातले पहिले भारतीय पंतप्रधान होण्याचा मान मोदींनी मिळवला आहे. आता ग्रीस पाठोपाठ सायप्रसचा दौरा करुन पंतप्रधान तुर्कीला स्पष्ट संदेश देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Comments
Add Comment

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत