Monday, June 16, 2025

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना

तिसरा व अंतिम लकी ड्रॉ आज काढणार


मुंबई : महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा तिसरा व अंतिम लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीने दि. १० जून रोजी काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षिस म्हणून दिला जाणार आहे, तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. दि. ७ एप्रिल व दि. ७ मे रोजीच्या पहिल्या व दुसऱ्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले आहे.



महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. दि.१ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीज बिले ऑनलाईन पद्धतीने भरणाऱ्या सर्व लघुदाब वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे.


ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (एल टी- लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असून, ज्यांनी १ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा ऑनलाईन पध्दतीने भरणा केलेला नाही. अधिक माहितीसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Comments
Add Comment