Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही गोष्ट साधता येत नाही. बदलत्या लाईफस्टाईलमुळे सध्या अनेकांना लठ्ठपणाची समस्या ग्रॉसत आहे. आज आम्ही तुम्हाला वेटलॉस आणि कंबरेची चरबी कमी करण्याबाबतची माहिती देत आहोत.



कॅलरी काऊंटवर नजर ठेवा


वजन कमी करण्यासाठी कॅलरी इनटेक कमी करणे गरजेचे असते. यासाठी खाण्या-पिण्याचा रेकॉर्ड बनवा. तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज घेत आहात यावर लक्ष ठेवा. जितके शक्य होईल तितके घरी बनवलेला हलका आहार घ्या. यामुळे यात कमीत कमी कॅलरीज असतील. तेल-मसाले, मैदा आणि साखरेपासून बनवलेल्या पदार्थांपासून दूर राहा.



प्रोटीन आणि फायबरयुक्त जेवण घ्या


वेट लॉससाठी प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. यामुळे शरीरास ताकद मिळेल आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहील. यामुळे हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यास मदत होईल.



दररोज व्यायाम गरजेचा


दररोजच्या व्यायामामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. व्यायामामुळे केवळ शरीराच निरोगी राहत नाही तर हेल्दी वजन कायम राखण्यास मदत होते.



पुरेसे पाणी प्या


पाणी शरीराला फिट ठेवण्यासोबतच मेटाबॉलिज्म वेगवान करण्यासही मदत करतात. यामुळे शरीरातून अधिकची चरबी कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला स्नॅकिंगची इच्छा झाली तर पाणी, लिंबू पाणी अथवा एखादे हेल्दी ड्रिंक घ्या. यामुळे तुम्हाला पोट भरलेले असल्यासारखे वाटेल.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे