कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण आजपासून सुरू झाले आहे.

मुंबई -मडगाव मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या धर्तीवर ही गाडी असणार आहे. कोकणात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने या गाडीची घोषणा केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनिस ते मडगाव जंक्शन दरम्यान एक ही विशेष गाडी (क्र. 01171) धावणार आहे. कोकणवासीयांसाठी तसेच गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडीचे वेळापत्रक असे - ही गाडी मुंबईतून १४ जून २०२५ सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता ती मडगावला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम आणि कमळी येथे थांबेल.

गाडीला आधुनिक एलएचबी डबे असतील. यात एक विस्टा डोम कोचचाही समावेश आहे. ३ चेअर कार, १० सेकंड सीटिंग डबे, एक एसएलआर आणि एक जनरेटर कार असेल.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी