समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

  93

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल झाला. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्याने संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी, २४ तासांत या महामार्गावरून तब्बल ३८ हजार ९८७ वाहनांनी प्रवास केला. यापैकी ५ हजार वाहने नव्याने वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या इगतपुरी – आमणे टप्प्यावरून धावली.


'महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील ६२५ किमी लांबीचा नागपूर – इगतपुरी टप्पा वाहतूक सेवेत होता.


इगतपुरी – आमणे हा ७६ किमी लांबीचा शेवटचा टप्पा गुरुवारपासून वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यामुळे आता समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल झाला असून नागपूर – आमणे, ठाणे प्रवास १६ तासांऐवजी ८ तासात करणे शक्य झाले आहे. एमएसआरडीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नागपूर – इगतपुरीदरम्यान अडीच वर्षात (१ जून २०२५पर्यंत) दोन कोटी ११ लाख ३४ हजार ३२२ वाहनांनी प्रवास केला आहे. तर या वाहनांकडून पथकराच्या रुपाने एमएसआरडीसीला १५३० कोटी रुपये महसूल मिळाला आहे.


समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला आहे. आता नागपूरवरून थेट ठाणे, मुंबईला अतिजलद येणे शक्य झाले आहे. त्यामुळे आता मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि नागपुरला जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. पहिल्या दिवशी समृद्धी महामार्गावरील प्रवासी संख्येत चांगली वाढ झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली