Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

  69

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे महामार्गावरच आपत्कालीन लँडिंग केल्याची घटना घडली. उत्तराखंडचे अतिरिक्त महासंचालक डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी ही माहिती दिली आहे.





ही हेलिकॉप्टर सेवा क्रेस्टेल एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत सुरू होती. हेलिकॉप्टरने सिरसी येथून प्रवाशांसह उड्डाण घेतले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे निर्धारित हेलिपॅडऐवजी त्याचे रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर रस्त्याच्या मध्यभागी उतरलेले दिसत आहे आणि त्याची मागील बाजू एका कारच्या छपरावर आदळल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.



सर्व प्रवासी आणि चालक दल सुरक्षित असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेबाबत नागर विमान संचालनालयाला अधिकृत माहिती देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, केदारनाथच्या दिशेने इतर हेलिकॉप्टर शटल सेवा नियमितपणे सुरू आहेत आणि उड्डाण वेळापत्रकानुसार कार्यरत आहेत. ही घटना चिंतेची असली तरी तत्परतेने घेतलेल्या उपाययोजनांमुळे मोठा अनर्थ टळला असून प्रशासनाने याबाबत अधिक तपास सुरू केला आहे.



१ जखमी ५ सुरक्षित


रुद्रप्रयागचे जिल्हा पर्यटन विकास अधिकारी आणि हेली सर्व्हिस नोडल अधिकारी राहुल चौबे म्हणाले की, “आज, ७ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास, केस्ट्रेल एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरमध्ये भरासू येथून उड्डाण घेत असताना तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर ते राष्ट्रीय महामार्गावर उतरले. विमानात ५ प्रवासी आणि एक पायलट होते. पायलट जखमी झाला असून, ५ ही प्रवासी सुरक्षित आहेत.”

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके