नुकसानग्रस्तांसाठी मिळाला पाऊणे दोन कोंटीचा निधी

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश


पालघर : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे, शेती, फळशेती, मत्स्य उत्पादने, पशू इत्यादीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नुकसान ग्रस्तासाठी निधीची आग्रही मागणी करून २ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे.


पालघर जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे एप्रिल आणि मे २०२५ महिन्यांत मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली. ४ ते ६ एप्रिल, ६ व ७ मे आणि २३ ते २५ मे २०२५ या कालावधीमध्ये जिल्ह्यात एकूण ३८ घरे पूर्णतः तर ३ हजार ८५२ घरे अंशतः बाधित झाली आहेत. याशिवाय १० झोपड्या पूर्णतः नष्ट झाल्या असून ६ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.


या आपत्तीग्रस्तांसाठी शासनाच्या महसूल व वन विभागाकडून २ कोटी ५० लाख ६३ हजार ९२५ इतक्या निधीची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात २ जून रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावाची सविस्तर माहिती घेऊन पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडला. मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ निधी वितरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग, यांचेमार्फत रु.२ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून तो संबंधित तहसिलदारांमार्फत बाधितांना वितरित करण्याचे काम सुरू आहे.



सर्वाधिक नुकसान घरांचे


जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा व पावसामुळे सर्वात जास्त नुकसान घरांचे झाले आहे. एकूण ३८ घरे पूर्णत: नष्ट झाली असून ३ हजार ८५२ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी २ कोटी ५० लाख ६३ हजार ९२५ रुपये निधीची मागणी करण्यात आली होती. शासनाने २ कोटी ७० लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे.


वादळी वारा व पावसामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या पुनर्वसनासाठी दिलासादायक ठरणार आहे. नुकसान झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील