आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

  37

बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी


बंगळूरु: बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु(आरसीबी)चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली.


एफआयआरमध्ये सदोष मनुष्यवधासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळूरुतील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांना जबाबदार धरले होते. त्यामुळे पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. नंतर कर्नाटकचे आयपीएस अधिकारी सीमांत कुमार सिंग यांची बंगळूरुचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.


एफआयआरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नव्हती. आरसीबी, डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट फर्म आणि राज्य क्रिकेट असोसिएशनने आवश्यक परवानगीशिवाय विजय साजरा केला.


आरसीबीने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरनंतर कायदेशीर कारवाईला सहकार्य करेल असे म्हटले आहे. अटक आरोपी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए नेटवर्क्सशी संबंधित आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) चे सचिव शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम यांच्याही घरी पोलिसांनी धडक दिली. मात्र ते घरी नव्हते. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


निखिल सोसाळे हे विमानाने मुंबईला जाण्याच्या तयारीत होते. त्यांना बंगळूरु विमानतळावर अटक करण्यात आली. त्याची चौकशी सुरू आहे. डीएनएचे इतर ३ कर्मचारी किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्यांना क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात आणले आहे, जिथे त्यांची चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये