ड्यूटी संपल्यामुळे वैमानिकाने दिला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान उडवण्यास नकार!

एकनाथ शिंदे यांचे विमान जळगाव विमानतळावर २० मिनिटे रखडले


जळगाव: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जळगाव दौऱ्यावरुन परत येत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान काल रात्री जळगाव विमानतळावर काही तास रखडले होते. याचे कारण म्हणजे, विमानाच्या वैमानिकाने विमान उड्डाणास नकार दिला होता. ज्यामुळे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जळगाव विमानतळावर काही वेळ ताटकळत प्रतीक्षा करावी लागली असल्याची बातमी समोर आली आहे.


दरम्यान, गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) या दोन्ही मंत्र्यांनी विमान कंपनीशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे विमान उडालेले पाहायला मिळाले आहे.



'या' कारणामुळे वैमानिकाने दिला होता विमान उडवण्यास नकार


वैमानिकांच्या ड्युटीची वेळ संपली असल्याने पुन्हा परवानगी घेण्यास काही वेळ लागतो. त्यामुळे परवानगी मिळेपर्यंत वैमानिकांनी विमान उड्डाणास नकार दिला होता. मात्र, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वैमानिकाच्या मनधरणीनंतर अखेर विमान मुंबईच्या दिशेने उडाले. मात्र तोपर्यंत तब्बल २० मिनिटे उपमुख्यमंत्री यांना विमानतलवार प्रतीक्षा करावी लागली होती.



पुण्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर शिंदेंचा जळगाव दौरा


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि.5) काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का दिला. अक्कलकोट येथील काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर शिंदे आज (दि. 6) दुपारी पुण्यातील मेट्रो 2025-27 च्या नवनिर्वाचित समितीची सर्वसाधारण सभा व पदस्थापना समारंभास उपस्थित राहिले. पुण्यातील हा समारंभ आटोपल्यानंतर ते जळगावला रवाना झाले होते.



गिरीश महाजन यांनी सांगितले कारण 


वैमानिकांच्या प्रकृतीसह त्याच्या वेळेचा किरकोळ विषय होता. त्याच्या कंपनीशी बोलणं करून एकनाथ शिंदे यांचे विमान रवाना झाल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.


आषाढी एकादशीला पंढरीच्या दर्शनासाठी संतश्रेष्ठ मुक्ताईंची पालखी आज पंढरपूराकडे मार्गस्थ झाली. या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे श्री संत मुक्ताईंचे भक्तिभावाने दर्शन घेतले. तसेच पालखीतील प्रतिमा आणि पादुकांचे मनोभावे दर्शन घेत पालखीचा खांदेकरी होऊन या वारीत सहभागी झाले. मात्र, येताना तांत्रिक अडचण आल्याने त्यांचे विमान रखडल्याचे पाहायला मिळाले.


Comments
Add Comment

डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येच्या

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर, अंबरनाथमध्ये शिवसेनेला दिलासा; भाजपाला मोठा धक्का

अंबरनाथ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल