काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व नक्षलवाद प्रभावी राज्यांमध्ये सुरक्षा पथकांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला यश मिळू लागले आहे. अनेक नक्षलवादी ठार झाले आहेत. कित्येकांना अटक झाली आहे. काही नक्षलवादी शरण आले आहेत. सुरक्षा पथकांनी चार प्रमुख नक्षलवाद्यांना ठार केले आहे. नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावल्या आहेत. यामुळे अनेकजण आनंदात आहेत. पण काँग्रेसला नक्षलवाद्यांची काळजी सतावू लागली आहे. काँग्रेस नेत्यांनी भाजपाकडे शस्त्रसंधीची मागणी केली आहे.

सुरक्षा पथकांनी सीपीआय माओवादी नक्षलवाद्यांचा सरचिटणीस नंबला केशव राव उर्फ ​​बसवराजू याला ठार केले. तसेच सुरक्षा पथकांनी सुधाकर उर्फ गौतम उर्फ नर्सिम्हा चालम,चलपती, प्रयाग मांझी यांनाही ठार केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे उच्चाटन केले जाईल असा पुनरुच्चार केला आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणा प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष बी. महेश कुमार गौड यांनी केंद्र सरकारकडे माओवाद्यांशी शांतता चर्चा सुरू करण्याची मागणी केली आहे. माओवादी हे भारताचे नागरिक आहेत, त्यांच्या विरोधात टोकाच्या संघर्षाची भूमिका घेण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा; असे महेश कुमार गौड म्हणाले.

जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सरकारने ही बाब समजून घ्यावी. माओवाद्यांचा विनाश करण्याच्या हेतूने कारवाई करू नये; असे महेश कुमार गौड म्हणाले. काँग्रेस दहशतवाद, नक्षलवाद यांचे समर्थन करत नाही. पण सर्व प्रकारच्या हिंसेला विरोध करते. काँग्रेस पक्षाचे मूलभूत तत्व अहिंसा आहे. आता, केंद्र सरकारला माझी विनंती आहे की शांतता चर्चा पुढे नेली पाहिजे, कारण जो कोणी आत्मसमर्पण करण्यास, शस्त्रे टाकण्यास आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यास तयार आहे त्याला तसे करण्याची संधी दिली पाहिजे; असेही महेश कुमार गौड म्हणाले.

 
Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या