Saturday, June 14, 2025

Rajgad Fort : पतीसह गेली राजगड फिरायला; पाय घसरला अन् थेट १५० फूट दरीत कोसळली

Rajgad Fort : पतीसह गेली राजगड फिरायला; पाय घसरला अन् थेट १५० फूट दरीत कोसळली

पुणे : पुण्यातील राजगडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावसाळा सुरु होताच अनेकांनी गाद किल्ले फिरायला सुरुवात केली आहे. पुण्यातील वेल्हे येथील राजगडावर फिरायला आलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पतीसोबत पर्यटनासाठी आलेल्या या विवाहित महिलेचा १५० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याचो घटना घडली आहे.


कोमल सतीश शिंदे (वय वर्षे २०) राहणार आळंदी, ता. खेड पुणे असे मृत महिलेचे नाव आहे, याचाबत अधिक माहिती देताना पोलिस म्हणाले, कोमल ही पतीसह राजगडावर पर्यटनासाठी आली होती. ही घटना राजगडावर काल गुरुवारी (दि.०५) घडली आहे.संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास बालेकिल्ला पाहून झाला होता. त्यानंतर बालेकिल्ल्यावरुन उतरत असताना ती कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. यानंतर मृतदेह गडावरून खाली आणण्यासाठी पोलीस जवान युवराज सोमवंशी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरघे, निलेश जाधव, संदीप सोळसकर, सनी माने, यांनी गडावर धाव घेत स्ट्रेचरच्या साह्याने मृतदेह गडावरून खाली आणला. दुपारी पाऊस पडल्याने गडावरील वाट निसरडी झाली होती. यामुळे मृतदेह खाली आणण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता.



उपचारापूर्वी मृत घोषित


दरम्यान, रात्री ११.३०च्या सुमारास वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शिवाजी कुरणकर यांनी कोमल हिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती दिली. रात्री उशिरा वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शिवाजी कुरणकर यांनी महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली आणि याबाबत अधिक तपास वेल्हे पोलिस करत आहेत.

Comments
Add Comment