छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारी ‘शिवसृष्टी’

१५ दिवसांत १५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट


पुणे: आशिया खंडातील सर्वांत भव्य ऐतिहासिक थीम पार्क असलेल्या आणि आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला मागील १५ दिवसांत तब्बल १५ हजारांहून अधिक शिवप्रेमींनी भेट दिली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारी शिवसृष्टी पाहून लहान थोर भारावल्याचे चित्र शिवसृष्टीमध्ये पाहायला मिळत आहे.


शिवकालीन वैभवाची साक्ष देणारा सरकारवाडा, भवानी मातेचे मंदिर, याचबरोबरच इतिहासाचे वैभव दाखविणाऱ्या वास्तू, विविध प्रकारे कथा, गोष्टी, चित्रे, संग्रहालयातील वस्तू यांद्वारे शिवसृष्टीत शिवरायांचा काळ अवतरला असून त्याची अनुभूती आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी सध्या नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.


विशेष म्हणजे ही अनुभूती घेण्यास इच्छुक असलेल्या शिवप्रेमींकडून येत्या १५ जुलै पर्यंतच्या मर्यादित कालावधीसाठी नाममात्र ५० रुपये प्रवेशशुल्क आकारले जात आहे. पुण्यातील अभय भुतडा फाऊंडेशनच्या वतीने शिवसृष्टीला देण्यात आलेल्या ५१ लाख रुपयांच्या देणगीद्वारे हे शक्य झाले असून याचा लाभ अधिकाधिक नागरीकांनी घ्यावा असे आवाहन शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.


सदर योजना सुरु झाल्यानंतर मागील पंधरा दिवसांत शिवसृष्टीला पंधरा हजारांहून अधिक शिवप्रेमींनी भेट दिली असल्याचे सांगत अनिल पवार पुढे म्हणाले, “उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असल्याने वातानुकूलिन अशा शिवसृष्टीत लहानथोरांना शिवकाळाचा अनुभव घेता येईल. महाराजांचा इतिहास, त्यांचा संघर्ष, त्यांनी पाहिलेली स्वराज्याची स्वप्ने, त्यांची राज्यपद्धती, यांची दूरदृष्टी यांबद्दल येणाऱ्या पिढ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म या विचारांचा प्रचार व प्रसार सर्वत्र झाला पाहिजे या प्रामाणिक हेतूने पुण्याजवळील आंबेगाव, ब्रुद्रुक, पुणे येथे तब्बल २१ एकर परिसरात उभारलेली शिवसृष्टी यानिमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचेल असा आम्हाला विश्वास आहे.”


५० रुपयांमध्ये शिवप्रेमींना पाहता येणार शिवसृष्टी


१५ जुलैपर्यंतचा मर्यादित कालावधी



शिवकाळाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार


शिवसृष्टीला भेट देणाऱ्यांना दुर्गवैभव’,‘रणांगण’ ही दालने, महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार उभा करणारे दालन, प्रत्यक्ष शिवराय आपल्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव देणारे ‘श्रीमंत योगी’ हे दालन, राज्याभिषेकाचा देखावा असलेला ‘सिंहासनाधिश्वर’ हे दालन, महाराजांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या महाराजांच्या चित्रांच्या (पेंटिंग्ज) हाय रेझोल्युशन इमेजेसच्या प्रिंट्स, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या लढायांची माहिती देणारे दालन, प्रतापगडावर असलेल्या तुळजा भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती आणि गंगासागर तलाव आदींना भेट देत शिवकाळाचा प्रत्यक्ष अनुभवच घेता येणार आहे.


टाईम मशीन थिएटर ही शिवप्रेमींसाठी एक पर्वणी : शिवाय टाईम मशीन थिएटर ही शिवप्रेमींसाठी एक पर्वणी ठरत असून यामधील कालकुपीत बसून आपण सुमारे काही हजार वर्षे मागे जातो व तेथून शिवाजी महाराजांचा काळ दृकश्राव्य पद्धतीने अनुभवता येईल. यामध्ये महाराजांशी संबंधित कथा या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिवप्रेमींसमोर येतात. यासाठी मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट्स व सर्वात महत्वाचे म्हणजे ३६० अंशामध्ये फिरणारे रोटेटिंग अर्थात फिरते थिएटर यांचा प्रामुख्याने अनुभव घेता येणार असून या कालकुपीच्या थिएटरमध्ये एका वेळी १०० व्यक्ती विशेष अशा ३६ मिनिटांच्या शोचा अनुभव घेऊ शकतात, असेही पवार यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना