विद्यापीठांच्या निधी प्रस्तावांना मंजुरी नाही : कृषिमंत्र्यांची तंबी

राहुरी : राज्यातील कृषी विद्यापीठांनी निधी मागणीचे प्रस्ताव सादर करताना आधी गरज स्पष्ट करावी. बांधकाम किंवा निधीसंबंधी कोणत्याही प्रस्तावांना सरसकट मान्यता दिली जाणार नाही,अशी तंबी कृषिमंत्र अँड माणिकराव कोकाटे यांनी दिली.


महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची ११९ वी बैठक सोमवारी (ता.२) पुण्यात झाली.या वेळी अध्यक्षस्थानावरून कृषिमंत्र्यांनी विद्यापीठांना खडेबोल सुनावले. सूरज मांढरे, प्रतिभा पाटील, तुषार पवार, रावसाहेब भागडे, डॉ.यशवंत साळे, डॉ.धीरजकुमार कदम, डॉ.किशोर शिंदे, डॉ.वैभव शिंदे, अंकुश नलावडे, जनार्दन कातकडे, वसंतराव नाईक, कुलगुरू डॉ.इंद्र मणी, गणेश शिंदे, विनायक काशीद, प्रवीण देशमुख, मोरेश्वर वानखेडे उपस्थित होते. कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ.देशमुख, कुलगुरू डॉ.शरद गडाख, डॉ.बाळासाहेब सावंत, डॉ.संजय भावे, डॉ.विवेक दामले दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. कृषी परिषदेच्या बैठकीत कोट्यवधी रुपयांच्या कामांसाठी निधी मंजुरीचे प्रस्ताव मांडले गेले आहेत.महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वसतिगृहांच्या बांधकामासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मागितला.पुणे कृषी महाविद्यालयात वसतिगृहासाठी १२ कोटी रुपये मागण्यात आले.धुळ्यात पावणेसहा कोटी,हाळगाव कृषी महाविद्यालयात बांधकामासाठी साडेचार कोटी रुपये,नंदुरबार कृषी महाविद्यालयात बांधकामासाठी १३ कोटी रुपये मागितले आहेत.


डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने पनवेलमध्ये बांधकामासाठी ४४ लाख रुपये,तर याच विद्यापीठाने जागा विकास व विहीर दुरुस्तीसाठी ३० लाख रुपये मागितले. याशिवाय महाविद्यालयांमधील बांधकामाकरिता आम्हाला ७० कोटींचा निधी द्या,असेही दापोलीच्या विद्यापीठाने प्रस्तावांमध्ये म्हटले आहे.सूत्रसंचालन म्हणण्यानुसार,कृषिमंत्र्यांनी या प्रस्तावांची निकड स्पष्ट करण्यास सांगितले.कृषी शिक्षण व संशोधनासाठी अत्यंत आवश्यक असलेल्य प्रस्तावांना मंजुरी देण्याची तयारी शासनाची आहे.तथापि, निधी खर्चाची आवश्यकता का वाटते या बाबत सादरीकरण केले जावे, असा आग्रह कृषिमंत्र्यांनी धरला.कृषी परिषदेच्या एका सदस्याने सांगितले की, कृषिमंत्र्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे.बैठकीत नेमके कोणते प्रस्ताव मंजूर केले गेले, कोणते नामंजूर किंवा स्थगित केले गेले याविषयी माहिती मिळू शकली नाही. कृषी परिषदेच्या बैठकीनंतर कृषिमंत्र्यांनी लगेचच विद्यापीठांच्या संशोधन व शिक्षणविषयक उपक्रमांचा आढावा घेतला.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग