चकमकीत नक्षली नेता सिंहाचलमचा मृत्यू

महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेशात गंभीर गुन्हे


गडचिरोली : छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत नक्षल चळवळीतील अत्यंत मोठा नेता आणि केंद्रीय समितीचा सदस्य सिंहाचलम याला चकमकीत ठार केले. या नक्षलवाद्याच्या मुसक्याचे राज्यभरात सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर गडचिरोली सीमेपासून जवळच असलेल्या भागात ही मोठी कारवाई घडली. वरिष्ठ माओवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने नक्षलविरोधी मोहीम सुरू केली, तेव्हा इंद्रावती राष्ट्रीय उद्यानातील जंगलात गोळीबार सुरू झाला होता.


सिंहाचलम हा गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रीय होता. तो नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता. विशेषतः नक्षल प्रचार आणि शिक्षण विभागाची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्याच्यावर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्रप्रदेश अशा ५ राज्यांत गंभीर गुन्हे दाखल होते. या राज्यांनी त्याच्यावर मिळून तब्बल ३ कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. या नक्षलवाद्याच्या मुसक्याचे राज्यभरात सातत्याने प्रयत्न सुरू होते.


इंद्रावती नॅशनल पार्कच्या घनदाट जंगलात नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत सीआरपीएफ व स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली असता दोन्ही गटांमध्ये जोरदार चकमक उडाली. यामध्ये सिंहाचलम ठार झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. या चकमकीनंतर गडचिरोली, सिरोंचा आणि अहेरी भागात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जाहीर केला आहे. सिंहाचलमसारखा मोठा नक्षल नेता ठार झाल्याने संघटनेला मोठा धक्का बसला असून संभाव्य सूड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ

दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा