'समृद्धी महामार्ग पूर्ण, आता शक्तिपीठ महामार्गही करू'

  153

इगतपुरी : समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास रस्त्यावरुन आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यासह संपूर्ण महामार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाच्या यशानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. शक्तिपीठ मार्गाचे काम करताना जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यावर कायद्याच्या चौकटीत राहून उत्तरं शोधली जातील, अशीही हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. समृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्ग हे दोन्ही रस्ते कार्यरत झाल्यावर राज्यातील सर्व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. विदर्भ आणि मराठवाड्याला प्रगतीच्या नवनव्या वाटा खुल्या होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शक्तिपीठ महामार्गाद्वारे राज्यातील बारा जिल्ह्यांना आणि तीन शक्तिपीठांना तसेच अनेक मोठ्या धार्मिक स्थळांना जोडले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



विदर्भातली वर्धा जिल्ह्यापासून कोकणापर्यंत ८०५ किमी. लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाद्वारे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर,धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडले जाईल. या सहा पदरी महामार्गावर २६ ठिकाणी इंटरचेंज असतील. या रस्त्यावर ४८ मोठे पूल, ३० बोगदे असतील. या मार्गाद्वारे कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवनी, नांदेडची माहूरची रेणुका देवी या शक्तिपीठांना जोडले जाईल. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.

आता महाराष्ट्रातील २४ जिल्हे जेएनपीटीसोबत जोडले गेले आहेत. आता राज्यातील जिल्हे वाढवण बंदराशी जोडण्याचे काम सुरू आहे. समृद्धी महामार्गाने हे काम सुरू केले आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्याचे टप्प्याचे पंतप्रधान मोदींनी, दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी, तिसऱ्या टप्प्याचे दादा भुसे यांनी आणि अंतिम टप्प्याचे मी उद्घाटन करत आहे. एकूण चार टप्प्यांत तयार झालेल्या समृद्धी महामार्गाचे प्रकल्प पूर्ण करुन लोकार्पण करण्यात आले आहे. या मार्गावर ७३ पूल आहेत. वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी अंडरपास आणि ओव्हरपास करण्यात आले आहेत.

शेवटचा टप्पा ७६ किमी आहे. यामध्ये पाच जुळे बोगदे आहेत. बोगद्यात साठ डिग्री तापमान झाल्यास आपोआप पाणी सुरू होते आणि तापमान कमी झाल्यास आपोआप बंद होते. हे सगळे बोगदे एकमेकांना जोडले आहेत. यात दोनशे मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण करण्याची तयारी आपण केली आहे. एकूण २२ ठिकाणी सुविधा केंद्र असतील. हा स्मार्ट रोड म्हणून विकसित करण्यात येत आहे. गेल कंपनीने संपूर्ण एक गॅस पाइपलाइन टाकली आहे. त्यामुळे जेवढे उद्योग या रस्त्याच्या बाजूला आहेत तिथे गॅस पुरवला जाईल. गडचिरोली इथे स्टील उद्योगाला गॅस पुरवला जाईल. शिर्डी, अजिंठा अशी ट्रॅफिक दहा लाख प्रति महिना सुरू आहे. ती आधी दोन लाख होती. आता शेवटच्या टप्प्यामुळे यात अजून वाढ होईल. वाशीच्या पुलावर ट्रॅफिक जॅम होते. ते कमी करण्यासाठी वाशीच्या पुलाचे लोकार्पण करत आहोत. जेव्हा काम सुरू केले तेव्हा अनेकांना वाटत होते की हे काम होणार नाही. पण आम्ही ते करून दाखवले. महायुतीच्या काळात याचे काम सुरू केले आणि आनंद आहे की महायुतीच्या काळात याचे लोकार्पण केले आहे. यापुढे आपल्याला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे. मराठवाड्याचं आर्थिक आणि औद्योगिक चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Comments
Add Comment

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; अतिक्रमणविरोधी मोहीम पुन्हा सुरू

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

टाटा इन्व्हेसमेंट लिमिटेडकडून Stocks Splits जाहीर शेअर 'या' निकालामुळे उसळला !

प्रतिनिधी: टाटा समूहाच्या कंपनीपैकी एक टाटा इव्हेंसमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

GST Collection: जीएसटी संग्रहणात 'इतक्या' कोटीसह महाराष्ट्रच प्रथम

प्रतिनिधी: महाराष्ट्र जीएसटी संकलनातील योगदानात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. त्यानंतर कर्नाटक (७%),

वीस वर्षांनी आम्ही एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का वाद घालता ? राज ठाकरेंचा सवाल

मुंबई : आम्ही दोघं भाऊ जर वीस वर्षांनी एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांशी का वाद घालता ? आता वाद न घालता