शर्मिष्ठा पनोलीला उच्च न्यायालयाने दिला जामीन

कोलकाता : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपासात सहकार्य करण्याची अट घालून शर्मिष्ठाला उच्च न्यायालयाने दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. शर्मिष्ठाला विना परवानगी देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. नव्याने ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज नाही, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. यानंतर शर्मिष्ठाला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठा विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर गुरुग्राम येथून तिला अटक केली होती. आक्षेपार्ह भाषेचा वापर करत कायदा सुव्यवस्थला बाधा आणणारे भाष्य केल्याचा आरोप शर्मिष्ठावर करण्यात आला होता. एरवी अनेक विषयांवर मतप्रदर्शन करणारे ऑपरेशन सिंदूर सुरू होताच मौनात गेल्याचे वक्तव्य शर्मिष्ठाने केले होते. सेलिब्रेटींवर शर्मिष्ठाने टीका केली होती. हा व्हिडीओ केल्यानंतर काही तासांनी शर्मिष्ठाने भावनेच्या भरात चुकीचे बोलल्याचे कबुल केले आणि व्हिडीओ डीलीट केला. पण या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठाविरोधात गुन्हा नोंदवला आणि तिला अटक केली होती.

शर्मिष्ठाने व्हिडीओ डीलीट केला आणि माफी मागितली त्यामुळे तिला अटक करण्याची आवश्यकताच नव्हती, असे मत अनेकांनी व्यक्त केले. यानंतर शर्मिष्ठाची सुटका करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारवर दबाव वाढला. अखेर कोलकाता उच्च न्यायालयाने सगळ्या बाजू तपासून शर्मिष्ठाला जामीन मंजूर केला.
Comments
Add Comment

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला