ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयार आहे. काही खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये पोहोचलेत. तर काही खेळाडू लवकरच पोहोचतील. या दौऱ्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलने गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने बंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.



बंगळुरू प्रकरणावर काय म्हणाले कोच


बंगळुरू प्रकरणावर जेव्हा कोच गंभीरला विचारले की तुम्ही या दुर्घटनेला कोणाला जबाबदार मानता, यावर गंभीर म्हणाला, कोण जबाबदार आहे हे ठरवणारा मी कोणी नाही. मात्र जेव्हा मी खेळाडू होतो तेव्हा अशा प्रकारच्या रोड शोवर विश्वास ठेवत नव्हतो. आता कोच म्हणूनही माझा याला पाठिंबा नाही. लोकांचे जीवन सगळ्यात महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला गर्दी नियंत्रणात ठेवता येत नसेल तर अशा रोड शोची कोणतीही गरज नाही.


गौतम गंभीर पुढे म्हणाले, मी नेहमीच मानतो की रोड शो नसले पाहिजे. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले त्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. २००७मध्येही जेव्हा आम्ही जिंकलो होतो तेव्हाही माझे म्हणणे हेच होते. अशा प्रकारचे आयोजन बंद दरवाजाच्या आत असले पाहिजे. तेथे जे काही घडले ते अतिशय दु:खद होते. आम्ही एक खेळाडू, फ्रेंचायझी आणि चाहते म्हणून अधिक जबाबदार असले पाहिजे.


Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत