वसईतील पारंपरिक व्यवसाय संकटात!

वसई : वसईचा परिसर हा पारंपरिक व्यवसायात अग्रेसर असा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांनी विविध पारंपरिक व्यवसाय नावारूपाला आणले आहेत. मात्र सध्याच्या बदलत्या काळाच्या ओघात हेच व्यवसाय अडचणीत सापडत आहेत अशी स्थिती निर्माण झाली आहे.


वसईच्या प्रत्येक पारंपारिक व्यवसायाने विविध स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यात विशेषतः मीठ उत्पादनाचा ही मोठा वाटा आहे.


वसईच्या भागात वनराशी मिठागर, आगरवती सलाम, नवामुख, हिरागर, शेणखई, गुरुप्रसाद, जुना वचक अशी वसई तालुक्यात ३० ते ३५ मिठागरे होती. या मिठागरातून पिकवलेले मीठ हे मुंबई, गुजरात, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पंढरपूर अशा ठिकाणी विक्रीसाठी जात असते. मागील काही वर्षापासून मिठागर उत्पादकांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. खाड्यांच्या वाढत्या प्रदूषणाने पाण्यातील मिठासाठी आवश्यक असलेला खारटपणा नष्ट केला. यंदाही मीठ उत्पादकांना आपला व्यवसाय हंगाम पूर्ण होण्याआधीच गुंडाळावा लागला.


विशेषतः मे महिन्यातील उष्णतेत निम्म्याहून अधिक उत्पादन घेतले जाते. यावर्षी मान्सूनपूर्व दाखल झालेल्या पावसाने मीठ उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे. सातत्याने अशा नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने हळूहळू मीठ उत्पादन ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तशीच काहीशी स्थिती मत्स्यव्यवसायाची सुद्धा झाली आहे. तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्रात आता व्यापारी वर्गाने घुसखोरी केली आहे. काही जण पर्ससीन जाळी, एलईडी दिवे यांचा वापर करून मासेमारी करतात. त्यामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमार यांच्यावर याचा परिणाम होत आहे.


अनिर्बंध होत असलेल्या मासेमारीमुळे मत्स्य साठे धोक्यात आले आहेत. तर दुसरीकडे आजही किनारपट्टीवर मासळी सुकवून त्यातून रोजगार मिळविणारे बांधव मोठ्या संख्येने आहे. त्यांनाही विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे वीटभट्टी या पारंपारिक व्यवसायाचीही काही वेगळी स्थिती नाही. मागील काही वर्षांपासून वीट उत्पादनात क्षेत्रातही अनेक समस्या उद्भवू लागल्या आहे. वाढत्या नागरीकरणामुळे वीट तयार करण्यासाठी आवश्यक माती शिल्लक नाही. तर दुसरीकडे काँक्रिटकरणापासून तयार केलेल्या सुप्रीम ब्लॉक वीट आल्याने मातीच्या विटा घेण्याचे प्रमाण ही कमी होत आहे. त्यातच जे वीट उत्पादक विटा तयार करतात त्यांना ही अधूनमधून पडणाऱ्या पावसाचा फटका बसत आहे. यावर्षी ही या वीट उत्पादकांना पावसाने चांगलाच फटका दिला आहे.

Comments
Add Comment

पालघरच्या मजुरांचा ‘मस्टर रोल’ राज्यभर पोहोचणार

ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून उपक्रमाचे कौतुक पालघर : पालघर जिल्ह्यातील मनरेगा योजनेअंतर्गत

एकाच महिला नेत्याला मिळाला प्रथम नागरिकाचा मान!

वसई-विरारमध्ये पाच पुरुष महापौर गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी

भाजपच्या रणनीतीपुढे विरोधकांचे पानिपत

विरोधी पक्षांची उडाली धूळधाण आघाडीत बिघाडी कायम वसंत भोईर वाडा : वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत स्वबळावर

जव्हार नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या पूजा उदावंत विजयी

जव्हार : जव्हार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत नगर परिषदेवर

वाड्यात कमळ फुलले; नगराध्यक्षपदी भाजपच्या रिमा गंधे

उबाठा गटाचा उडवला धुव्वा वाडा : वाडा नगरपंचायतीच्या रविवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने नगराध्यक्ष पदासह १२

खासदारांची ‘फिल्डिंग’ होम ग्राउंडवर यशस्वी!

वाडा पालिकेत स्पष्ट बहुमतासह नगराध्यक्षही भाजपचा गणेश पाटील पालघर : जिल्ह्यात निवडणूक झालेल्या तीन नगर