तामिळनाडूमध्ये सापडला 'अपशकुनी मासा'! आजही गूढ कायम...

तामिळनाडूमध्ये सापडला डूम्सडे मासा, हा मासा म्हणजे आगामी संकटाची चाहूल!


चेन्नई: तामिळनाडूच्या किनाऱ्यावर मच्छिमारांच्या जाळ्यात सापडलेल्या एका गूढ आणि विशाल माशाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या माशाला अपशकुनी मासा असं म्हंटलं जातं. कारण हा जिथे दिसतो, तिथे संकटं हमखास येतात असा एक जगात समज आहे. याला 'डूम्सडे मासा' असेही म्हणतात.


तामिळनाडूच्या किनाऱ्यावर मच्छिमारांना सापडलेल्या डूम्सडे माश्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या माशाचे दुर्दैव्य म्हणजे याला जगात अपशकुनी म्हंटलं जातं. या माश्याची लांबी जवळपास ३० फूटांपर्यंत असू शकते. या मासा तामिळनाडूच्या किनाऱपट्टीवर कसा आला? याला अपशकुनी असे का म्हंटले गेले? असे अनेक प्रश्न सामान्य लोकांना पडले आहेत. तर याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 


आजही समुद्राच्या खोलवर असे अनेक रहस्यमय प्राणी राहतात, ज्याबद्दल माणसांना फार कमी माहिती आहे. यापैकी एक ओअरफिश आहे, ज्याला जग 'डूम्सडे मासा' म्हणून देखील ओळखते. त्याची झलक खूप दुर्मिळ आहे, परंतु जेव्हा हा मासा पृष्ठभागावर दिसतो तेव्हा एका अनाहूत भीतीची लाट घेऊन येतो. हा मासा आकाराने विशाल असल्यामुळे, जेव्हा तो जाळ्यात सापडला तेव्हा ७ मच्छिमारांना त्याला एकत्र उचलावे लागले.  या अनोख्या माशाचे शरीर चांदीसारखे चमकदार, आकाराने लवचिक आणि लहरी होते, तसेच त्याच्या डोक्याजवळील लाल कंगव्यासारखे पंख पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर दिनांक ३१ मे रोजी X हँडल @sanatan_kannada ने पोस्ट केला होता, जो प्रचंड व्हायरल झाला. 





या ओअरफिशची लांबी जवळपास ३० फूटांपर्यंत असण्याची शक्यता आहे, आणि हा मासा समुद्राच्या २०० ते १००० मीटर खोलीवर राहतो. त्यामुळे, त्याचे पृष्ठभागावर येणे केवळ दुर्मिळच नाही तर धक्कादायक देखील आहे.   



'डूम्सडे फिश' अपशकुनी का आहे?


वर्षानुवर्षे या ओअरफिशबद्दल एक समज आहे, की त्याचे दिसणे म्हणजे एखाद्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे आगमन.  हा समज निर्माण होण्यासाठी एक मोठी घटना त्यावेळी कारणीभूत ठरली होती. २०११ साली  जपानमध्ये भयानक भूकंप आणि त्सुनामी येण्यापूर्वी समुद्रकिनाऱ्यावर अनेक ओअरफिश मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर, हा विश्वास अधिक दृढ झाला की या माशाचा जमिनीखाली होणाऱ्या हालचालींशी काही रहस्यमय संबंध असू शकतो. त्याच वेळी, जपानी समजुतींनुसार, समुद्राच्या खोलवरून पृष्ठभागावर ओअरफिशचे आगमन हे समुद्राच्या खाली काहीतरी मोठी हालचाल होत असल्याचे संकेत आहे. तिथे त्याला एक नैसर्गिक इशारा म्हणून पाहिले जाते.



जगाच्या इतर भागातही दिसला होता हा मासा


केवळ जपानमध्येच नाही तर मेक्सिकोमध्येही ओअरफिश दिसल्यानंतर काही काळाने भूकंप झाला. यामुळेच त्याला 'डूम्सडे फिश' हे नाव पडले. आता जेव्हा हा मासा भारतातील तामिळनाडूमध्ये दिसला आहे, तेव्हा लोकांच्या मनात पुन्हा तेच भय आणि प्रश्न निर्माण झाले आहेत, की हे काही आपत्तीचे लक्षण आहे का?



शास्त्रज्ञ काय म्हणतात?


शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवायचा झाला तर, आतापर्यंत असे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत जे हे सिद्ध करू शकतील की ओअरफिश येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावू शकतो. त्यांच्या मते, पृष्ठभागावर येण्यामागील कारण पर्यावरणीय बदल किंवा समुद्राच्या खोलीत काही प्रकारची अशांतता असू शकते. परंतु, याबाबत गूढ अद्याप कायम आहे की,  प्रत्येक वेळी जेव्हा हा मासा दिसतो तेव्हा काहीतरी मोठे का घडते? हा खरोखरच एक योगायोग आहे की काही अज्ञात संकेत आहे? याचे उत्तर अद्याप कोणाकडेही नाही !

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी