MP Accident : लग्नसोहळा आटोपून परतताना भीषण अपघात, ट्रकची व्हॅनला धडक अन् ९ जण ठार

  50

झाबुआ : मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री सिमेंटच्या ट्रकने व्हॅनला धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झालेत. अपघाताला बळी पडलेले लोक लग्नसोहळा आटोपून कारने घरी परतात असताना हा अपघात घडला.


यासंदर्भातील माहितीनुसार थंडला-मेघनगर दरम्यान संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळील वळणावर ट्रक आणि व्हॅनची धडक झाली. मृतांपैकी ८ जण थंडलाजवळील शिवगड महुदा येथील रहिवासी होते. तर आणखी एक मृत शिवगडजवळील गावातील आहे. मेघनगर येथे मंगळवारी रात्री राजस्थानहून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक इको व्हॅनवर उलटला. या अपघातात इको व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या ९ जणांचा मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारमधून लोकांना बाहेर काढले. तपासणीनंतर डॉक्टरांनी ९ जणांना मृत घोषित केले, तर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



झाबुआचे पोलिस अधीक्षक पद्मविलोचन शुक्ला या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी सांगितले की, रात्री २ वाजताच्या सुमारास मेघनगर तहसील हद्दीतील संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळील रस्त्यावरून ट्रक बांधकाम सुरू असलेला रेल्वे ओव्हर ब्रिज ओलांडत होता. तेव्हा त्याचा तोल गेला आणि तो एका कारवर उलटला. ट्रक सिमेंटने भरलेला होता. कारमधील प्रवासी एकाच कुटुंबातील असून लग्न समारंभातून परतत होते.

Comments
Add Comment

प्रधानमंत्री जन धन योजनेत महिलांची ५६ टक्के भागीदारी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री जन धन योजनेला गुरुवारी ११ वर्ष पूर्ण झाली. ही योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आली

'राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला'

नवी दिल्ली : राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला. हम दो हमारे तीन, हे धोरण राष्ट्रीय हितासाठी अवलंबिले

दरवर्षी २३ सप्टेंबरला साजरा होणार आयुर्वेद दिवस

नवी दिल्ली : भारत सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेत आयुर्वेद दिवसाची तारीख कायमची ठरवली आहे. मार्च २०२५ मध्ये

सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला, दोन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये गुरुवारी भारतीय लष्कर आणि स्थानिक

MLA Crime news : आमदारपुत्राच्या बंगल्यातून २० वर्षीय तरुणीचा झाडाला लटकलेला मृतदेह; हत्या की आत्महत्या?

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यातील खरगापूर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार चंदा सिंह गौर

नेपाळमार्गे बिहारमध्ये जैशच्या दहशतवाद्यांची घुसखोरी, पोलिसांनी दिला हायअलर्ट

पाटणा : पाकिस्तान पुरस्कृत जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या किमान तीन दहशतवाद्यांनी नेपाळमार्गे