Thanya Nathan C: अभिमानस्पद! देशाला मिळाल्या पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश

देशाला लवकरच पहिल्या महिला दृष्टिहीन न्यायाधीश मिळणार आहेत. ही देशासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे. केरळच्या दृष्टिहीन वकील तान्या नाथन सी. (Thanya Nathan C.) लवकरच राज्यातील पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश होणार आहेत.


केरळच्या 'सिव्हिल जज' (ज्युनियर डिव्हिजन) पदांसाठी नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत त्यांनी दिव्यांग श्रेणीतील गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. २४ वर्षीय तान्या या कन्नूर विद्यापीठाच्या लॉ ग्रॅज्युएट असून त्यांनी एलएलबी परीक्षेतही प्रथम क्रमांक मिळवला होता.


जन्मजात अंधत्व असूनही तान्या यांनी ब्रेल लिपी, स्क्रीन रीडिंग तंत्रज्ञान आणि अढळ संकल्पाच्या जोरावर आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचं हे यश केवळ वैयक्तिक मेहनतीचे उदाहरण नसून न्यायक्षेत्रातील सर्वसमावेशकतेचं प्रतीक ठरत आहे.



कोण आहेत तान्या नाथन सी ?


न्यायाधीश होण्यापूर्वी तान्या कंजूर जिल्ह्यातील तातिपरम्बा येथे एक पॅक्टिसिंग वकील (Practicing lawyer) म्हणून कार्यरत होत्या. अवघ्या २४ वर्षांच्या वयात त्यांनी हे यश मिळवून संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. तान्या जन्मजात दृष्टिहीन असून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण धर्मा होम या विशेष शाळेत घेतले. पुढे पारासिनीक्कडवू उच्च माध्यमिक शाळेतून दहावी आणि मोराझा सरकारी उच्च माध्यमिक शाळेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. बारावीनंतर त्यांनी कायदाचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतता, कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि कन्जूर विद्यापीठातील एलएलबी अभ्यासक्रमात अव्वत स्थान मिळवले. त्या संस्थेतील त्या एकमेव दृष्टिहीन विद्यार्थिनी होत्या, तान्या नाथन यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नसून, तो दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचा आणि समावेशक न्यायव्यवस्थेचा सशक्त संदेश देणारा ठरत आहे.


यापूर्वी, २०१३ साली राजस्थानचे ब्रह्मानंद शर्मा (Brahmanand Sharma) हे भारतातील पहिले दृष्टीहिन न्यायाधीश ठरते होते. तर जागतिक स्तरावर सर जॉन अपनी वॉल पांना जगातील पहिले १०० टक्के नेत्रहिन न्यायाधीश मानले जातात.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)