आयआरसीटीसीच्या सहलीसाठी ५ टक्के सवलत

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीला ९ जून २०२५ रोजी सुरुवात होणार असून ही सहल ५ रात्री आणि ६ दिवसांची आहे. या सहलीचे आरक्षण करण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले असून पर्यटकांना पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे.


‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर ही सवलत देण्यात येणार आहे. या सहलीला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरुवात होणार असून पर्यटकांना दादर, ठाणे स्थानकावरूनही सहलीत सहभागी होता येणार आहे. सहलीत सहभागी पर्यटकांना किल्ले रायगड, लाल महाल आणि कसबा गणपती, शिवसृष्टी, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा आदी किल्ले, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर या ठिकाणांना भेट देता येणार आहे.


हा सर्व प्रवास अत्याधुनिक भारत गौरव एसी टुरिस्ट ट्रेनमधून होणार आहे. या रेल्वेगाडीला शयनयान, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे जोडण्यात आले असून या गाडीची क्षमता ७४८ पर्यटकांना सामावून घेण्याइतकी आहे.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे