पीएमपीचे मोबाइल ॲप १५ लाख प्रवाशांनी केले डाउनलोड

पुणे: शहरातील प्रवास सुलभ व्हावा यासाठी रिअल-टाइम बस ट्रॅकिंग, रूट मार्गदर्शन, ऑनलाइन तिकीट बुकिंग, पास व्यवस्थापन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना देण्यासाठी पीएमपीने ‘आपली पीएमपी मोबाइल ॲप’ चार महिन्यांपूर्वी सुरू केले होते.


सुरुवातीला ॲप डाउनलोड करण्याचे प्रमाण कमी होते. परंतु आता या मोबाइल ॲपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १५ लाख पुणेकर प्रवाशांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. शिवाय वापरताना येणाऱ्या अडचणी कमी झाल्यामुळे प्रवाशांना सोयीचे झाले आहे.


‘आपली पीएमपी मोबाइल ॲप’मुळे प्रवाशांना गाड्यांची वेळ, ठिकाण लाइव्ह दिसते. त्यामुळे दैनंदिन प्रवासी संख्येचा विचार करता जवळपास ९० टक्के प्रवासी डिजिटल पद्धतीचा अवलंब करत आहेत. या ॲपद्वारे बसचा मार्ग, वेळापत्रक, थांबे याची त्वरित माहिती मिळते, तिकीट खरेदी करणेही सोपे झाले आहे. सुरुवातीला ॲपला कमी प्रतिसाद होता. आता वापरकर्ते वाढले आहेत. त्यामुळे ही संख्या १५ लाखांपेक्षा जास्त पोहोचली आहे. शिवाय आयफोनधारक प्रवासी ॲप डाउनलोड करत आहे. त्यामुळे मोबाइल ॲपचे वापरकर्ते वाढत आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या