पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या आजपासून ऑनलाईन परीक्षा

पुणे:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील शैक्षणिक विभागांमध्ये असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ऑनलाईन प्रवेश परीक्षा ३ ते ५ जून या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने देता येणार आहे. प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत, त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

उर्वरित अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाइन परीक्षेला हजर राहावे.विद्यार्थ्यांनी त्यांना सोयीस्कर ठिकाणाहून त्यांच्या नोंदणीकृत लॉगीन आयडीने लॉगीन करावे, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी परीक्षेसाठी फ्रंट कॅमेरा असलेला मोबाईल फोन, टॅब, आय-पॅड वापरून ऑनलाइन परीक्षा प्रणालीमध्ये लॉग इन करू शकतात. एकदा लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्याला दिलेल्या सत्रात परीक्षा पूर्ण करावी लागेल. ही परीक्षा १०० गुणांची आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नाच्या दिलेल्या गुणांपैकी वजा केले जातील.
Comments
Add Comment

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय