बीकेसीतील तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीए फायद्यात

  168

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र प्रदान


मुंबई:मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने बीकेस-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील तीन अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक भूखंडांचे वाटपपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आज प्रदान केले. या भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला ३ हजार ८४० कोटी ४९ लाख रुपये मिळाले आहेत. यामुळे १५ हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती शक्य होणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख हस्ते सुमिटोमो रिॲलिटी अँड डेव्हलपमेंट लि. या जपानी कंपनीला दोन भूखंडाचे आणि ब्रूकफिल्ड स्ट्रॅटेजिक रिअल इस्टेट या कंपनीला एक भूखंडाचे वाटपपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी तसेच जपानचे शिष्टमंडळ आदी उपस्थित होते.


मुंबई बीकेसी येथील सी-१३ आणि सी-१९ या दोन्ही भूखंडांसाठी गोईसू रिॲलिटी प्रा.लि. (सुमिटोमो रिॲलिटी अँड डेव्हलपमेंट लि., जपानची भारतीय उपकंपनी) ने सर्वोच्च बोली लावली होती. तसेच सी-८० या भूखंडास स्क्लोस बंगलोर लि. (ब्रूकफिल्ड स्ट्रॅटेजिक रिअल इस्टेट पार्टनर्स ३ ची भारतीय उपकंपनी), अर्लीगा इको स्पेस बिझीनेस पार्क व स्क्लोस चाणक्य प्रा. लि. यांच्या संयुक्त भागीदारीने सर्वोच्च बोली लावली होती.


प्लॉट सी-१३ या भूखंडाचे ७,०७१.९० वर्ग मीटर क्षेत्रफळ असून ₹ ९७४.५१ आरक्षित किंमत होती.


लिलावमध्ये या प्लॉटच्या बोलीत ₹ १,३६०.४८ किंमत मिळाली. प्लॉट सी-१९ या भूखंडाचे ६,०९६.६७ वर्ग मीटर क्षेत्रफळ असून ₹ ८४०.१२ ही आरक्षित किंमत होती. लिलावमध्ये या प्लॉटला ₹१,१७७.८६ रक्कम मिळाली. तसेच, सी- ८० या भूखंडाचे क्षेत्रफळ ८४११.८८ असून आरक्षित किंमत ₹ १,१५९.१६ होती. लिलावमध्ये या प्लॉटला ₹१,३०२.१६ रुपये बोली मिळाली. या तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यामुळे एमएमआरडीएला एकूण ₹ ३,८४०.४९ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले असून, जवळपास १५ हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) ५५व्या वार्षिक बैठकीत दरम्यान एमएमआरडीएने सुमिटोमो व ब्रूकफिल्ड या कंपन्यांसोबत अनुक्रमे युएसडी ५ अब्ज व युएसडी १२ अब्ज गुंतवणुकीच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ही विकासकामे एमएमआरडीएच्या ग्रोथ हब स्ट्रॅट्रेजी व नीती आयोगाच्या जी - हब उपक्रमांखालील सक्रिय गुंतवणूक प्रोत्साहनाचा भाग आहेत. मुंबई महानगर प्रदेशात २०३० पबीकेसीर्यंत युएसडी ३०० अब्ज अर्थव्यवस्था व ३० लाख रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, भूमिगत मेट्रो, एलिवेटेड मेट्रो व बुलेट ट्रेनच्या जाळ्यामुळे बीकेसी लवकरच नंबर वन व्यावसायिक केंद्र होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही