वसई - विरार शहरात भाजपा संघटनेमध्ये महिला 'राज' !

जिल्हाध्यक्षपदी भाजपाने संघटनेतील महिलेस दिली संधी


विरार : भारतीय जनता पक्षाच्या संघटन शक्तीमध्ये बूथ समितीपासून तर प्रदेश परिषद सदस्यांपर्यंत महिलाशक्ती वाढविण्यावर भर असून, वसईमध्ये -वसई शहर मंडळ अध्यक्षानंतर आता वसई -विरारच्या जिल्हाध्यक्षपदी भाजपाने संघटनातील एका महिलेला संधी दिल्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदाच महिलाराज आल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मंडळ अध्यक्षापासून तर जिल्हाध्यक्ष पदापर्यंत संघटनात्मक निवडणुका पार पडल्या आहेत. प्राथमिक सदस्य नोंदणी, बूथ समित्या, शक्ती केंद्रप्रमुख, मंडळ अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून एक या प्रमाणे प्रदेश परिषद निवडीचा कार्यक्रम संपूर्ण राज्यात पार पडला आहे. दरम्यान, प्रत्येक बूथ समितीमध्ये किमान ३ महिला सदस्य घेणे बाबत अनिवार्य करून जास्तीत जास्त महिलांना भाजपासोबत जोडण्याचे काम करण्यात आले आहे. एकंदरीतच महिलांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भाजपाकडून करण्यात येत आहे.



दरम्यान, वसई विधानसभेचा गड भाजपाने जिंकल्यानंतर आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या रुपाने महिलांनाही वसई-विरारमध्ये खंबीर नेतृत्व मिळाले आहे. विधानसभा जिंकल्यानंतर भाजपामधील नारीशक्ती अधिक सक्रिय झालेली आहे. अशातच नुकतेच झालेल्या मंडळ अध्यक्ष निवड प्रक्रियेत वसई-विरार आणि पालघर मधील ३० मंडळ अध्यक्षांपैकी केवळ वसई शहर मंडळ अध्यक्षपदी मारिया उर्फ गीतांजली दरीवाला यांची वर्णी लागली. गीतांजली दरीवाला या सहजरित्या मंडळ अध्यक्ष बनल्या नाहीत. बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर मंडळ अध्यक्ष पदाचा मुकुट त्यांना मिळाला आहे. आता वसई-विरार जिल्हाध्यक्ष पदावर प्रज्ञा पाटील यांची निवड झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत वसई-विरार मध्ये भाजपाला चांगले यश मिळवून देण्यात महिला मतदारांचा निर्णय महत्वाचा राहणार आहे. त्यामुळे भाजपाच्या संघटनेतील वाढती नारीशक्ती मोलाची भूमिका निभावेल या अनुषंगाने भाजपाकडून विश्वास टाकण्यात आला आहे.
Comments
Add Comment

महापालिका प्रशासन लागले निवडणुकीच्या कामाला

विरार : महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका प्रशासन निवडणूक

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांना तीन दिवस बंदी

घोडबंदर मार्गावरील दुरुस्तीसाठी बदल पालघर : ठाणे - घोडबंदर मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीचे नियोजन न

एकाच वेळी संसदेत मांडली तीन विधेयक

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना यश पालघर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी निगडित तीन महत्त्वपूर्ण विधयके

न्याय मागणाऱ्या महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार

आरोपी हवालदारास अटक डहाणू : आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर

नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद

ग्रामीण भागातही ३० हजार दुबार मतदार

जिल्हा परिषदेच्या ५७ गटातील मतदारांचा समावेश पालघर : मतदार याद्यांमधील दुबार नावावरून सर्वत्र राजकीय वातावरण