तनपुरे कारखाना अखेर तनपुरेंकडे!

  41

१४ वर्षांनतर सत्तांतर, मोठ्या फरकाने पॅनेलची कूच


बाळकृष्ण भोसले


राहुरी : बहुचर्चित डाॅ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी (शरद पवार) चे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे प्रणित जनसेवा मंडळाचा चौदा वर्षांच्या प्रदिर्घ राजकीय वनवासानंतर २१ पैकी २१ जागा मिळवत कारखान्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळवले आहे. सभासद व कामगारांनी विश्वास दाखवत कारखान्याची सुत्रे तनपुरेंकडे सुपुर्द करत, चाक फिरविण्याचे मोठे आव्हान आता त्यांचेसमोर ठेवले आहे. बाजार समितीचे सभापती व मंडळाचे प्रमुख अरूण तनपुरे व रावसाहेब चाचा तनपुरे यांचा विजयी उमेदवारात समावेश आहे.



सकाळी ८ वाजता राहुरी शहराजवळील लोकनेते रामदास पा. धुमाळ महाविद्यालयात मतमोजणीस प्रारंभ झाला. निवडणुक निर्णय अधिकारी किरण सावंत व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार नामदेव पाटील यांच्या अधिपत्याखाली तसेच पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखालील तगड्या बंदोबस्तात मतमोजणीस सुरूवात झाली. मतदान बॅलेट पेपरवर असल्याने निकाल येण्यास उशीर होत होता.त्यानंतर ग्रामीण भागातून कार्यकर्त्यांनी हळूहळू मतमोजणी केंद्राकडे कूच करत विजयाचा जल्लोष करण्यास सुरूवात केली तद्नंतर त्याचीच पुनरावृत्ती गटातून होत, कोल्हार खुर्द गटातून अशोक ज्ञानदेव उर्हे (७३२९) व ज्ञानेश्वर कोळसे (६९०९) विजयी घोषित करण्यात आले. तर देवळाली प्रवरा गटातून अरूण कोंडिराम ढुस (६८७४), कृष्णा नानासाहेब मुसमाडे (६७४७), भारत नानासाहेब वारूळे (६५५४) टाकळीमियाॅ गटातून मिना सुरेश करपे (७२३७), ज्ञानेश्वर बळीराम खुळे (७०८१), ज्ञानेश्वर हरी पवार (७०८१), आरडगाव गटातून प्रमोद रावसाहेब तारडे (६९८३), वैशाली भारत तारडे (६७११), सुनील भानुदास मोरे (६७८६) वांबोरी गटातून किसन कारभारी जवरे (७४२४), भास्कर जगन्नाथ ढोकणे (७३३३) राहुरी गटातून जनार्दन उर्फ गणेश लक्ष्मण गाडे (६६७४), अरूण बाबुराव तनपुरे (६९४७) अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून अरूण नानासाहेब ठोकळे (७२३६) महिला राखीव मतदार संघातून सपना प्रकाश भुजाडी (६७८६), जनाबाई धोंडीराम सोनवणे (६५६५) इतर मागास प्रवर्गातून रावसाहेब यादव तनपुरे (७१३७) प्रमुख उमेदवारात अरूण तनपुरे यांनी तब्बल अठ्ठावीसशे वर मतांची आघाडी घेतली.यावेळी श्रीरामपुर विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक बसवराज शिवपुजे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ