शहरातील रस्त्यामधील दुभाजकही सौंदर्याने फुलणार

पालिकेकडून ५३ हजार शोभिवंत झाडांचे नियोजन


वसई : वसई-विरार शहरात विविध प्रकारच्या कारणांमुळे प्रदूषण वाढू लागले आहे. हे प्रदूषण नियंत्रणासोबतच त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाच्या अंतर्गत शहराला प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी तसेच हवेतील प्राणवायूचे (ऑक्सिजन) प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेने यंदा शहराच्या विविध ठिकाणच्या रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकांच्या मध्ये वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.


रस्त्याच्या मध्य भागी असलेल्या दुभाजकांच्या मध्येही व प्रमुख सर्कलच्या मध्ये विविध प्रकारची शोभिवंत ५३ हजार ६४१ इतक्या झाडांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात दुभाजकही सौंदर्याने फुलणार आहेत. नव्याने तयार होणारे दुभाजक व यापूर्वीचे जे दुभाजक मोकळ्या स्थितीत आहेत अशा ठिकाणी ही झाडे लावली जाणार आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करताना ही हिरवळ दिसून येईल. याशिवाय या झाडांमुळे पालिकेच्या शहर सौंदर्यात ही भर पडण्यास मोठी मदत होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.




यापूर्वी २४ ठिकाणी लागवड


यापूर्वी शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम) ८५ लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला होता. यासाठी शहरातील २४ ठिकाणी असलेल्या दुभाजकांची निवड करून दुभाजकांच्या मध्ये विविध प्रकारची शोभिवंत वृक्षांची लागवड करण्यात आली होती.




वसई-विरार शहरातील दुभाजकांच्या मध्येही शोभिवंत झाडे वृक्ष प्राधिकरण विभागाकडून लावली जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- समीर भूमकर, उपायुक्त वृक्ष प्राधिकरण विभाग महापालिका


Comments
Add Comment

विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

विरार : विरार पश्चिमेच्या ओलांडा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून

जिल्ह्यातील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर

पालघर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन

वसई-विरार पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

विरार (प्रतिनिधी): वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रारूप

विरार-सफाळे जलमार्गावर बोट फेऱ्या वाढणार

बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचे निर्देश विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या