अन्नसुरक्षेचे उल्लंघन झाल्याप्रकरणी धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची मोठी कारवाई

मुंबई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी झेप्टो (Zepto) ची मूळ कंपनी किराणाकार्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचा मुंबई, धारावीतील परवाना निलंबित केला आहे. महाराष्ट्र एफडीएने धारावी येथील झेप्टोच्या गोदामावर अचानक छापा टाकला, यादरम्यान सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, आणि अन्नपदार्थ साठवणुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले, त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.

 धारावीच्या सुविधेत गंभीर अन्नसुरक्षेचे उल्लंघन झाल्याप्रकरणी एफडीएद्वारे हे निलंबन जारी करण्यात आले आहे. निरीक्षकांना अन्नपदार्थांवर बुरशीची वाढ, साचलेल्या पाण्याजवळ अन्न साठवणे आणि कालबाह्य झालेले उत्पादने आढळून आली. काही अन्नपदार्थ थेट ओल्या आणि अस्वच्छ जमिनीवर साठवले जात होते आणि शीतगृह युनिट्स निर्धारित सुरक्षा नियमांचे पालन करत नसल्याचे देखील आढळून आले.  

अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम आणि सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी राम बोडके यांनी ही कारवाई केली आहे. तपासणीनंतर, सहाय्यक आयुक्त (अन्न) अनुपमा पाटील यांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ३२(३) आणि अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसायांचे परवाना आणि नोंदणी) नियम, २०११ च्या नियमन २.१.८(४) अंतर्गत निलंबन आदेश जारी केले.

मीडियाला दिलेल्या माहितीत एफडीएने म्हटले की, आम्ही काही काळापासून या गोदामांची तपासणी करण्याची योजना आखत होतो. यादरम्यान आम्हाला अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयाद्वारे काही सूचना प्राप्त झाल्या. या सूचनांच्या आधारावर आम्ही तपासणी केली असता अतिशय वाईट परिस्थिती आढळली. त्यामुळेच आम्ही तात्काळ परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. अन्न सुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन होईपर्यंत आणि परवाना प्राधिकरणाकडून मंजुरी मिळेपर्यंत परवाना निलंबित राहील. या कारवाईवर कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु अशा कारवाईमुळे कंपनीच्या ब्रँड प्रतिमेवर आणि ग्राहकांच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो.

Zepto ची प्रतिक्रिया?


या कारवाईवर Zepto कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या घटनेमुळे त्यांच्या ब्रँडवर आणि ग्राहकांच्या विश्वासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये

मुंबईत २२ वर्षांत कुठे आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग

इमारतींना ओसी, पण प्रत्यक्षात सत्ताकाळात उबाठाला अंमलबजावणी करण्यात अपयश उबाठ- मनसेचा वचननामा, आमचा

दोन माजी बेस्ट समिती अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषवलेले दोन माजी नगरसेवक यंदा पालिका निवडणुकीच्या रिंगणात

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास टोल-फ्री समुपदेशन!

मुंबई (प्रतिनिधी) : सीबीएसईने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मानसिक व सामाजिक समुपदेशन सेवा सुरू