टायर रिसायकलिंग फॅक्टरी दिवसा बंद, रात्री सुरू

वाडा  : टायर रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्यांमुळे वाडा तालुक्यातील हवा दूषित झाली होती. त्यामुळे वडवली गावाच्या हद्दीत असलेल्या दहा प्रदूषणकारी कारखाने पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केले होते. बंद केलेले हे कारखाने शासनाचे आदेश धाब्यावर बसवून रात्री खुलेआम चालू असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे.



तालुक्यातील वडवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जुने टायर जाळून त्यापासून ऑइल तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. प्रदूषित रासायनिक सांडपाणी हे येथील नैसर्गिक नाल्यात टाकत असल्याने नाल्यातील मासे अनेकवेळा मृत पावले आहेत. या प्रदूषणाबाबत अनेकदा पत्र व्यवहार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळे झाक करत आहे. त्यामुळे त्याचा त्रास येथील सहन करावा लागत आहे.

येथील एम. डी. पायरोलिसेस या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आणि या स्फोटात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. प्रशासनाने कारखाने बंद केले. तरीदेखील आदेशाची पायमल्ली करत प्रदूषणकारी हे सर्व कारखाने रात्री सुरू असल्याचे उघडकीस आणले आहे. मात्र प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Comments
Add Comment

मच्छीमारांना आता क्यूआर कोडचे ओळखपत्र

हानिकारक मासेमारीवर बंदी नवीन नियमानुसार, एलईडीद्वारे मासे पकडणे, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंगसारख्या

पालघर नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे!

मोबिन शेख पालघर : आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढली असून तिरंगी लढतीचे संकेत

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील