सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पनोलीला अटक

गुरुग्राम : कोलकाता पोलिसांनी पुण्याच्या लॉ कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पनोलीला गुरुग्राममधून अटक केली. शर्मिष्ठाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आता हा व्हिडीओ दिसत नाही. या व्हिडीओत 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात बोलताना शर्मिष्ठाने बॉलिवूड सेलिब्रेटी आणि विशिष्ट धर्माच्या नागरिकांवर टीका केली होती. या व्हिडीओ प्रकरणी कोलकाता येथे एक तक्रार दाखल झाली. यानंतर कोलकाता पोलिसांनी कारवाई केली आणि शर्मिष्ठाला अटक केली. शर्मिष्ठाच्या व्हिडीओवर ऑनलाईन पद्धतीने अनेकांनी आक्षेप नोंदवल्यामुळे आता हा व्हिडीओ दिसत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

बॉलिवूड सेलिब्रेटी चित्रपटात देशासाठी बलिदान देण्याची भाषा करतात. पण ऑपरेशन सिंदूर सुरू होते त्यावेळी सरकारच्या बाजूने आणि पाकिस्तान विरोधात बोलण्याची हिंमत अनेक कलाकारांनी दाखवली नव्हती. हे निरीक्षण नोंदवत शर्मिष्ठाने व्हिडीओद्वारे बॉलिवूड सेलिब्रेटी आणि विशिष्ट धर्माच्या नागरिकांवर टीका केली होती. ऑनलाईन आक्षेप वाढल्यावर शर्मिष्ठाने एक नवा व्हिडीओ केला आणि ज्यांची मनं दुखावली अशा सर्वांची माफ मागितली होती. पण या माफीनाम्याने वाद शमला नाही. प्रकरण आणखी चिघळले आणि कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठाला अटक केली.
Comments
Add Comment

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार

अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला

‘अयोध्या बस झाँकी है, काशी-मथुरा बाकी है’: योगी आदित्यनाथ

सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज चालणार नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८