एसटी वाहतूक, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा!

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रशासनाला सूचना


शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दक्षता घ्या


सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० मेपासून आतापर्यंत ५३६ मिलिमीटर मान्सूनपूर्व पाऊस झाला. या मान्सूनपूर्व पावसामुळे २६ हेक्टर क्षेत्रात कृषी उत्पादनाचे नुकसान झाले आहे. जवळपास ९१ घरे व गोठ्यांचे अंशत: नुकसान झाले आहे. यामुळे १७५ शेतकरी बाधित झाले आहेत. याच काळात सर्पदंशाने एक व विजेच्या धक्क्याने एक असे दोन मृत्यू झाले आहेत. याबाबतचा आढावा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी घेत जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिक यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गतिमान सेवा द्यावी. आपत्तीची देय नुकसानभरपाई तातडीने द्यावी. जिल्ह्यातील नागरिकांना अशा आपत्तीच्या काळात तत्पर सेवा द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.


खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी भवनात झाली. जिल्ह्यातील अवकाळी पाऊस, आपत्तीचा काळ याबाबतचा आढावा त्यांनी घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी यावर्षी झालेले एकूण पर्जन्यमान व नुकसानभरपाईचा आढावा दिला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते.



जिल्ह्यातील एसटी बसेस सेवा सुरळीत राहावी म्हणून त्याचाही आढावा घेतला. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घ्या. याकडेही विभाग नियंत्रकांनी गांभीयाने पाहावे, अशा सूचना दिल्या. नैसर्गिक आपत्तीमध्ये वीस पुरवठा खंडित होऊ शकतो. मात्र याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असा सूचना दिल्या.



भरपाईची रक्कम तातडीने द्यावी


मान्सून पूर्व पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्याचे जे नुकसान झाले आहे, त्या बाधित शेतकऱ्यांना देय असलेली नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. ९१ घरे, गोठे यांचे अंशत: नुकसान झाले असून जवळपास ३१ लाखांचे नुकसान झाले आहे, तर आठ कच्च्या घरांचे नुकसान झाले असून ते दीड लाखांचे आहे. त्याबाबत देय नुकसान भरपाईची रक्कम तातडीने द्या, अशा सूचनाही खासदार नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Comments
Add Comment

कणकवलीत उद्या नगरपंचायतीसाठी मतदान

ईव्हीएमसह अधिकारी - कर्मचारी केंद्रांकडे रवाना कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या (२ डिसेंबर) मतदान

कणकवली बाजारपेठेत भाजपची प्रचार रॅली

कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि १७ नगरसेवक

माझा पाठिंबा भाजपच्या उमेदवारांनाच खासदार नारायण राणे यांची स्पष्टोक्ती

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ उमेदवारांनी घेतले खासदार राणे यांचे

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारात पालकमंत्री नितेश राणेंची एन्ट्री

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुध्द शहर विकास आघाडी अशी लढत आहे. निवडणुकीचे वातावरण

अखेरच्या दिवशी सिंधुदुर्गात इच्छुकांची धावपळ

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले नगर परिषद तर कणकवली नगरपंचायतीची निवडणूक

वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मजबूत धक्का

आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल वैभववाडी : वैभववाडी परिसरात राजकीय