सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात सर्वांचे योगदान आवश्यक

सिंधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे. साक्षरतेमध्ये राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे. दहावी आणि बारावीच्या निकालात कोकण विभागात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रशासनातील अधिकारी देखील जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.


जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला, वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुकास्तरीय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, पोलिस अधीक्षक डॉ. मनोज दहिकर, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा बँकेच अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते.



पालकमंत्री पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये आपल्या जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले. राज्यस्तरावरील मोहिमेमध्ये क्रमांक पटकाविलेल्या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्कार केला आणि त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि मी तेव्हाच ठरविले होते, की या मोहिमेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले असेल त्यांचा मी जिल्हावासियांच्यावतीने आभार मानणार आणि त्यांचा सत्कार करणार. तुम्ही चांगलं काम करत असाल, तर तुमच्या मागे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी नेहमी उभा आहे. पुढील पाच वर्षामध्ये जिल्ह्याला पुढे घेऊन जायचे आहे.


यामध्ये मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे असेही ते म्हणाले. पालकमंत्री पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा आहे. म्हणून खासदार राणे साहेबांनी देखील शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील शाळांचा स्तर उंचवला पाहिजे, त्यातून दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. कोकणातल्या संपूर्ण निकालामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तसेच जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा, शिक्षणासाठी चांगले वातावरण, कायदा आणि सुव्यवस्था योग्य पद्धतीने राखणे, जिल्ह्याची प्रतिमा सुधारणे या सगळ्या गोष्टींकडे आम्ही फार बारकाईने लक्ष देत आहोत. आज विद्यार्थ्यांचा सत्कार झाला आहे तो त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यात असलेल्या गुणांचा सत्कार झाला आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या पालकांना विश्वास देतो की तुमच्यासाठी दर्जेदार शिक्षणाची दालने आम्ही निश्चितपणे उघडे करू. त्या दिशेने आमच्या सगळ्यांची वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले.



पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन



  • दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध

  • दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न

  • सिंधुदुर्गला विकसित जिल्हा बनविणार

  • गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा गौरव

Comments
Add Comment

कणकवलीत उद्या नगरपंचायतीसाठी मतदान

ईव्हीएमसह अधिकारी - कर्मचारी केंद्रांकडे रवाना कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या (२ डिसेंबर) मतदान

कणकवली बाजारपेठेत भाजपची प्रचार रॅली

कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि १७ नगरसेवक

माझा पाठिंबा भाजपच्या उमेदवारांनाच खासदार नारायण राणे यांची स्पष्टोक्ती

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ उमेदवारांनी घेतले खासदार राणे यांचे

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारात पालकमंत्री नितेश राणेंची एन्ट्री

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुध्द शहर विकास आघाडी अशी लढत आहे. निवडणुकीचे वातावरण

अखेरच्या दिवशी सिंधुदुर्गात इच्छुकांची धावपळ

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले नगर परिषद तर कणकवली नगरपंचायतीची निवडणूक

वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मजबूत धक्का

आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल वैभववाडी : वैभववाडी परिसरात राजकीय