पोहण्यासाठी गेलेल्या ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू

पुणे : पोहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा दमछाक होऊन बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवार (दि.३१) मे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चाकणजवळील कडाचीवाडी (ता.खेड ) गावच्या हद्दीतील पाझर तलावात हा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने चाकण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


ओमकार बाबासाहेब हंगे (वय१३ वर्ष, सध्या रा. मार्तंडनगर,मेदनकरवाडी, मूळ रा. हंगेवाडी, ता. केज, जि.बीड), श्लोक जगदीश मानकर (वय १३ वर्षे, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा.धनवडी, ता.वरुड, जि.अमरावती), प्रसाद शंकर देशमुख( वय १३ वर्षे, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा.अंबुलगा, ता.मुखेड, जि.नांदेड), नैतिक गोपाल मोरे ( वय १३ वर्षे, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. बुलढाणा झरी बाजार, ता.अकोट, जि.अकोला) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.



हे चार जण शनिवारी राहत्या घरातून सकाळी अकरा वाजल्याच्या दरम्यान पोहण्यासाठी गेले होते. चाकणजवळील कडाचीवाडी गावच्या हद्दीतील पाझर तलावामध्ये पोहण्यासाठी उतरले होते. पोहताना दमछाक होऊन या सर्वांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारपर्यंत हे चौघे जण घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. पाझर तलावाच्या काठावर त्यांच्या चपला व कपडे मिळून आल्या. स्थानिक नागरिकांसह आपदा मित्रांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. नातेवाईकांनी मुलांचे मृतदेह पाहताच एकच हंबरडा फोडला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने नातेवाईकांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Comments
Add Comment

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण

घोडबंदर रोडवर भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू, दुचाकीचालक गंभीर जखमी

ठाणे : घोडबंदर वाहिनीवरील विजय गार्डन स्काय वॉक ब्रिजखाली, रविवार रात्री

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा - बावनकुळे

नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी,

शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून