या बैठकीत २०२४-२५ च्या योजनांची अंमलबजावणी, खर्चाचे विश्लेषण तसेच २०२५-२६ च्या नव्या योजनांची आखणी यावर सविस्तर चर्चा झाली. गेल्या आर्थिक वर्षात मंजूर कामांसाठी उपलब्ध असलेल्या ₹१०८८.७७ कोटींपैकी ९९.८ टक्के म्हणजेच ₹१०८६.७५ कोटी निधी विविध यंत्रणांना वितरित करण्यात आला होता.
Pakistani Spy Arrested : हनी ट्रॅप मध्ये अडकला नेव्हल डॉकचा फिटर, बनला पाकिस्तानी गुप्तहेर
ठाणे: नेव्हल डॉकमध्ये फिटर म्हणून कामाला असलेला कर्मचारी रवी वर्माला पाकिस्तासाठी हेरगिरी (Pakistani Spy in thane) करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रवी ...
प्रमुख कामे
- झोपडपट्टी सुधारणा व पुनर्वसन : ₹५९७.४२ कोटींची नागरी दलितेतर वस्ती सुधारणा, ₹१२५ कोटींच्या संरक्षक भिंती, ₹६४.७४ कोटी दलितवस्ती योजना, तसेच ₹४.५ कोटींचे कौशल्य विकास कार्यक्रम.
- पोलीस व तुरुंग विभाग : पायाभूत सुविधांसाठी, वाहने व संगणकीय साधने पुरवण्यासाठी ₹१४.०६ कोटींचा निधी
- आपत्कालीन व महसूल यंत्रणा : गतीशील प्रशासनासाठी ₹४.५ कोटींचा निधी.
- महिला व बाल विकास : बालगृहांसाठी सीसीटीव्ही आणि संस्थांचे बळकटीकरणासाठी ₹१४.०६ कोटी निधी.
- सौरऊर्जा उपक्रम : ₹२ कोटींच्या सौर संचांची उभारणी.






